निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:06 PM2022-06-02T17:06:34+5:302022-06-02T17:07:17+5:30

Ishq Vishk Movie: २००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे.

Nipun Dharmadhikari debuts in Bollywood to make sequel to Shahid Kapoor's 'Ishq Vishk' | निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल

निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल

googlenewsNext

२००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क (Ishq Vishka) या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री अमृता राव (Amruta Rao) यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रमेश तौराणी यांनी चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. 'इश्क विश्क रिबाउंड' (Ishq Vishka Rebound) असे या सीक्वलचे नाव आहे. या चित्रपटातून निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. तो या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 

इश्क विश्क रिबाउंड चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करून निर्मात्यांनी चार नवोदित कलाकारांची ओळख करून दिली आहे. या चित्रपटात रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.


या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून निपुण धर्माधिकारीने लिहिले की, माझा दिग्दर्शन असलेला पहिला हिंदी चित्रपट. जेव्हा अॅप्सवर नातेसंबंध शोधले जाऊ शकतात आणि चॅटमध्ये गमावलेही जाऊ शकतात, तेव्हा तुम्हाला माहित आहे की प्रेमाला अपग्रेडची आवश्यकता आहे. इश्क विश्क रिबाउंड. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.
इश्क विश्क रिबाउंड बद्दल निर्माते रमेश तौरानी म्हणाले की, इश्क विश्क रिबाउंड आधुनिक काळातील प्रेमाचे विचार अपग्रेड करेल. चित्रपटातील कलाकारांची निवड अगदी योग्य आहे आणि आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी चांगला वेळ व्यतित करत आहोत.

Web Title: Nipun Dharmadhikari debuts in Bollywood to make sequel to Shahid Kapoor's 'Ishq Vishk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.