प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:13 PM2021-06-15T12:13:00+5:302021-06-15T12:13:59+5:30

निक जोनासने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक अंदाजात दिसतो आहे.

Nick Jonas appeared in a romantic mood with Priyanka Chopra, shared the post | प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट

प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट

googlenewsNext

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राचे देशातच नाही तर जगभरात चाहते आहे. प्रियंका आणि तिचा नवरा निक जोनास वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच निक जोनासने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत निक आणि प्रियंका रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि बऱ्याचदा ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतेच निक जोनासने प्रियंका चोप्रासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.

निक आणि प्रियंका एका सोफ्यावर बसलेली दिसते आहे. चाहत्यांना निकचा हा अंदाज खूप भावला आहे. निकने फोटो शेअर करत प्रियंका चोप्रावरील प्रेमही व्यक्त केले आहे.


निकने फोटो शेअर करत लिहिले की, ती, फक्त आणि काहीच नाही. ही पोस्ट आहे. मी माझ्या प्रेमाची आठवण काढत आहे. सध्या प्रियंका चोप्रा लंडनमध्ये शूटिंग करते आहे. तर निक जोनास लॉस अँजेलिसमध्ये आहे. त्यामुळे तो त्याच्या पत्नीला खूप मिस करतो आहे.

Web Title: Nick Jonas appeared in a romantic mood with Priyanka Chopra, shared the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.