​पतीच्या बचावासाठी मैदानात उतरली नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 10:57 IST2018-03-11T05:27:16+5:302018-03-11T10:57:16+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या दोन दिवसांपासून वैयक्तिक कारणाने चर्चेत आहे. नवाजुद्दीनला त्याची पत्नी आलिया सिद्दीकीवर संशय आहे आणि याच ...

Niazuddin Siddiqui's wife Alia Siddiqui came to the ground for her escape! | ​पतीच्या बचावासाठी मैदानात उतरली नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी!

​पतीच्या बचावासाठी मैदानात उतरली नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी!

िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या दोन दिवसांपासून वैयक्तिक कारणाने चर्चेत आहे. नवाजुद्दीनला त्याची पत्नी आलिया सिद्दीकीवर संशय आहे आणि याच संशयापोटी त्याने म्हणे, आलियाचे सीडीआर काढले होते. आपली पत्नी कुठे जाते, कुणाशी बोलते हे जाणून घेणे, यामागचा उद्देश होता, अशी बातमी कालपासून चर्चेत आहे. अर्थात नवाजुद्दीनने या बातम्या खोट्या ठरवत, पत्नीची हेरगिरी केल्याचा आरोप खोडून काढला होता.  नवाजुद्दीनच्या खुलाशानंतर आतात्याची पत्नी आलिया हिनेही यासंदर्भात खुलासा केला आहे.  फेसबुकवर एक पोस्ट लिहून याप्रकरणी तिने नवाजचा बचाव केला आहे.



तिने लिहिले आहे की, मीडियात नवाजुद्दीनबद्दल येत असलेल्या बातम्या पाहून मी हैरान आहे. आधीही माझ्या व नवाजबद्दल नाही नाही त्या बातम्या मीडियात येत राहिल्या आहेत.  आमच्या घटस्फोटाच्या आणि विभक्त होण्याच्या बातम्याही मीडियाने दिल्यात. पण कालपासून जी बातमी पसरलीयं, ती पाहून आम्हा दोघांनाही धक्का बसला आहे आणि म्हणून मला माझी चुप्पी तोडावी लागतेयं. काही दिवसांपूर्वी नवाजच्या बायोग्राफवरूनही त्याला टीका झेलावी लागली. नवाजची दोष इतकाच होता की, तो सत्य बोलला. नवाज कायम खरे बोलतो. त्याच्या मनात कुठेच खोटेपणा नाही. माझे व नवाजचे नाते १५ वर्षांपासूनचे आहे. त्याकाळात नवाज काहीही नव्हता. एका छोट्याशा घरातून सुरु झालेल्या आमच्या प्रेमकहाणीत अनेक चढऊतार आलेत. पण आम्ही हार मानली नाही. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न केले. नवाजनेही पुढच्या काळात करिअरचे शिखर गाठले. जी काही कमतरता होती ती आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी यांच्या जन्माने पूर्ण झाली. नवाज जगासाठी  एक सेलिब्रिटी असेल. पण माझ्यासाठी तो केवळ  नवाज आहे. त्याचे खुले विचार हे मला त्याच्यातील आवडणारी सगळ्यांत चांगली गोष्ट. त्याला जितकी त्याची स्वत:ची स्पेस आवडते, तो दुस-यांनाही तेवढीच स्पेस देतो. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे आमचे धर्म. मी हिंदू ब्राह्मण आहे. तर नवाज  मुस्लिम. पण नवाजने कधीही माझ्यावर स्वत:चा धर्म थोपण्याचा प्रयत्न केला नाही. तो जितका स्वत:च्या धर्माचा आदर करतो, तेवढाच माझ्या धर्माचा आदर करतो. आमच्या नात्याचा पाया भरभक्कम आहे. याचमुळे तो एक चांगला पती, चांगला पिता आणि तितकाच चांगला माणूस आहे. आजही त्याच्या डोक्यात हवा गेलेली नाही. त्याचे जुने मित्र आजहीत्याच्यासोबत आहेत. साधे आयुष्य, साध्या सोप्या आवडी. नवाज आजही तोच नवाज आहे. उरली गोष्ट सीडीआरची तर सत्य लवकरच लोकांसमोर येईल. मी केवळ इतकेच म्हणेल की, नवाजवरचे आरोप खोटे व निराधार आहे. सेलिब्रिटी असल्याने तो सॉफ्ट टार्गेट ठरतोय.

ALSO READ :  नवाजुद्दीन सिद्दीकीने नाकारले एक्स गर्लफ्रेन्ड सुनीतासोबतचे रिलेशन; केला वेगळाच दावा!! 

 

Web Title: Niazuddin Siddiqui's wife Alia Siddiqui came to the ground for her escape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.