नेहाच्या आनंदामागे आहे ‘करन्सी स्ट्राईक’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 15:48 IST2016-11-10T15:43:42+5:302016-11-10T15:48:26+5:30
अभिनेत्री नेहा धूपिया सध्या चर्चेत आहे, ते तिच्या ‘टॉक आॅफ दी टाऊन’ या शोमुळे. नेहा या शोची होस्ट आहे आणि ‘नॉन फिल्टर’ प्रश्न विचारून विचारून तिने सेलिब्रिटींना हैरान करून सोडले आहे. यामुळे कदाचित सेलिब्रिटी वैतागले आहेत पण नेहा मात्र जाम आनंदात आहे. एकीकडे या शोची होस्ट बनून तिला मज्जा येतेय. दुसरीकडे ‘करन्सी स्ट्राईक’च्या मोदी सरकारच्या निर्णयाने नेहाचा ३० लाखांचा फायदा झाला आहे.

नेहाच्या आनंदामागे आहे ‘करन्सी स्ट्राईक’ !
अ िनेत्री नेहा धूपिया सध्या चर्चेत आहे, ते तिच्या ‘टॉक आॅफ दी टाऊन’ या शोमुळे. नेहा या शोची होस्ट आहे आणि ‘नॉन फिल्टर’ प्रश्न विचारून विचारून तिने सेलिब्रिटींना हैरान करून सोडले आहे. यामुळे कदाचित सेलिब्रिटी वैतागले आहेत पण नेहा मात्र जाम आनंदात आहे. एकीकडे या शोची होस्ट बनून तिला मज्जा येतेय. दुसरीकडे ‘करन्सी स्ट्राईक’च्या मोदी सरकारच्या निर्णयाने नेहाचा ३० लाखांचा फायदा झाला आहे. नाही कळले ना? तर ऐका,नेहा व रणवीर शौरी यांचा ‘मोह माया मनी’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. या चित्रपटाला काळ्या पैशाचा एक अँगल आहे. पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाने ‘मोह माया मनी’चे घरबसल्या प्रमोशन होत आहे. यामुळे चित्रपटास सुमारे २५ ते ३० लाख रूपयांचा फायदा होणार आहे. हे आम्ही नाही तर खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक मुनीष भारद्वाज यांनीच सांगितलेय. हा चित्रपट भ्रष्टाचार, मनी ग्रीड आणि ब्लॅकमनीवर आधारित आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ५०० व १००० च्या नोटा वरून पडत असताना दाखवले आहे. एका पोस्टरमध्ये रणवीर पाचशे व हजारांचया नोटा बाजूला ठेवून झोपलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर करताच ‘मोह माया मनी’ची ही दोन्ही पोस्टर्स आणि चित्रपटाचे ट्रेलर अचानक ट्रेंडमध्ये आलेत. साहजिक सोशल मीडियावर चित्रपटाची फुकटात पब्लिसिटी झाली. आता ही फुकटातील पब्लिसिटी पैशात मोजल्यास २५ ते ३० लाखांच्या घरात जाते. इतका फायदा बघितल्याच कुणालाही आनंद होणार. नेहाच्या आनंदामागेही हेच कारण आहे.
![]()
![]()