New Song Out : ​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’तील ‘बखेडा’ तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 12:35 IST2017-07-05T07:05:48+5:302017-07-05T12:35:48+5:30

अक्षय कुमार स्टारर ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची प्रेक्षकांना मनापासून प्रतीक्षा आहे. गत महिन्यात रिलीज झालेला चित्रपटाचे ट्रेलर आणि ‘हस मत पगली’ हे गाणे पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे आऊट झाले आहे.

New Song Out: Do you see 'restless' story of a 'love story'? | New Song Out : ​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’तील ‘बखेडा’ तुम्ही पाहिलातं?

New Song Out : ​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’तील ‘बखेडा’ तुम्ही पाहिलातं?

्षय कुमार स्टारर ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची प्रेक्षकांना मनापासून प्रतीक्षा आहे. गत महिन्यात रिलीज झालेला चित्रपटाचे ट्रेलर आणि  ‘हस मत पगली’ हे गाणे पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे आऊट झाले आहे. होय, ‘जग में ना इश्क सा बडा बखेडा’ असे बोल असलेले हे गाणे गायले आहे, सुखविंदर सिंह आणि सुनिधी चौहान यांनी. या गाण्याचा व्हिडिओ बघताना तुम्हाला मजा येईल, हे आम्ही दाव्यानिशी सांगतोय. अक्षय व भूमी पेडणेकर या दोघांची गाण्यातील केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे.  



ALSO READ : रिलीज आधीच अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेमकथा' वादात

या चित्रपटाचे ‘हस मत पगली’ हे गाणे तुफान लोकप्रीय झाले आहे. या गाण्याचे मेल आणि फिमेल असे दोन्ही व्हर्जन आपण ऐकलेत. याशिवाय या गाण्याचे ड्यूएट व्हर्जनही रिलीज केले गेलेय. अरूण भाटिया निर्मित या चित्रपटात अक्षय व भूमी मुख्य भूमिकेत आहेत. केशव आणि जया नामक व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहे. केशव व जया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नसल्याच्या कारणाने जया घर सोडून निघून जाते. आता हा ‘बखेडा’ कसा सुटतो, हे मात्र तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत तुम्ही या नव्या गाण्यातील  अक्षय व भूमीचे बहरलेले प्रेम पाहायला हवे. पाहा तर आणि हे गाणे तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.

Web Title: New Song Out: Do you see 'restless' story of a 'love story'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.