New Poster Out : ‘इंदु सरकार’मधील नील नितीन मुकेशचा पहा संजय गांधी लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 22:13 IST2017-06-14T12:25:35+5:302017-06-14T22:13:38+5:30

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या आगामी ‘इंदु सरकार’ या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, पोस्टरमध्ये अभिनेता नील नितीन ...

New Poster Out: See Neil Nitin Mukesh's 'Indu Sarkar' Sanjay Gandhi Look! | New Poster Out : ‘इंदु सरकार’मधील नील नितीन मुकेशचा पहा संजय गांधी लुक!

New Poster Out : ‘इंदु सरकार’मधील नील नितीन मुकेशचा पहा संजय गांधी लुक!

ग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या आगामी ‘इंदु सरकार’ या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, पोस्टरमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. चित्रपटात नीलने संजय गांधी यांची भूमिका साकारली आहे. पोस्टरमध्ये नीलचा लूक संजय गांधी यांच्याशी बºयापैकी साम्य साधणारा आहे. मधुर भंडारकर यांनी हे पोस्टर रिलीज करतानाच या चित्रपटाचे ट्रेलर १६ जून म्हणजेच दोन दिवसानंतर रिलीज होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

ALSO READ : मधुर भांडारकरच्या या सिनेमात सुप्रिया विनोद पुन्हा साकारणार 'आयर्न लेडी' इंदिरा गांधी !

नीलने हे पोस्टर शेअर करताना म्हटले की, आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वाधिक साहसी भूमिका मी या चित्रपटात साकारत आहे. मधुर भंडारकर यांचा बहुचर्चित चित्रपट येत्या २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. ‘पेज थ्री’चे दिग्दर्शन केलेल्या मधुर यांनीच याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. दरम्यान याच दिवशी प्रकाश झा यांचा ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. 



‘इंदु सरकार’मध्ये कीर्ती कुल्हारी, तोता रॉय चौधरी, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीवर आधारित आहे. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. तब्बल २१ महिने आणीबाणी कायम होती. त्यावरच आधारित हा चित्रपट असल्याने इतिहासाला उजाळा देणारा ठरणार आहे. 

दरम्यान नील ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटातही बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती त्याने इन्स्टावर त्याच्या चाहत्यांना दिली होती. 

Web Title: New Poster Out: See Neil Nitin Mukesh's 'Indu Sarkar' Sanjay Gandhi Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.