New Photo : हा पहा शाहिद कपूरच्या मुलीचा क्यूट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 15:31 IST2017-03-04T10:01:23+5:302017-03-04T15:31:23+5:30

शाहिद कपूरची लाडकी मीशा आता सहा महिन्यांची झाली आहे. यानिमित्त शाहिदने नुकतेच मीशाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ...

New Photo: This is Shahid Kapoor's daughter's cute photo! | New Photo : हा पहा शाहिद कपूरच्या मुलीचा क्यूट फोटो!

New Photo : हा पहा शाहिद कपूरच्या मुलीचा क्यूट फोटो!

हिद कपूरची लाडकी मीशा आता सहा महिन्यांची झाली आहे. यानिमित्त शाहिदने नुकतेच मीशाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. फोटोमध्ये मीशाला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रेषा असलेला हेअरबॅण्ड, क्रीमी फुल टी-शर्ट आणि ब्लू जिंस घातलेली आहे. त्यामुळे ती खूपच गोड दिसत आहे. 



शाहिदने हा फोटो शेअर करताना,"Moo Moo here and a Moo Moo there" असे लिहले आहे. गेल्या महिन्यातच शाहिदने मीशाचा पहिला फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये मीशाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मीरा तिच्या गालावर कीस करताना फोटोत दिसत होती. हा मीशाचा पहिलाच फ्रंट फोटो होता. कारण या अगोदर जेव्हा-केव्हा मीशाची झलक बघावयास मिळाली तेव्हा तिचा फोटो स्पष्टपणे दिसला नव्हता. 

शाहिद आणि मीराच्या या लाडक्या मुलीचा जन्म २६ आॅगस्ट २०१६ रोजी झाला होता. जन्मापासून शाहिद मीशाविषयी खूपच पजेसिव्ह असल्याचे बघावयास मिळत होते. कारण तो तिला नेहमीच कॅमेºयांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. जेव्हा शाहिदला एयरपोर्टवर मीशासोबत बघितले होते, तेव्हा त्याने मीशाला पूर्णपणे कव्हर केले होते. त्यामुळे तिची झलक कॅमेºयात टिपणे अशक्य झाले होते. 



३१ डिसेंबर रोजी शाहिदने मीशाच्या पायाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर पत्नी मीरासोबतचा फोटो त्याने शेअर केला होता. आता त्याने मीशाची पूर्ण झलक दिसेल असा फोटो शेअर केला असून, यामध्ये मीशा खूपच क्यूट दिसत आहे. शाहिदचा नुकताच ‘रंगून’ हा सिनेमा रिलिज झाला असल्याने तो सध्या फॅमिलीसोबत अधिक वेळ देत आहे. त्यामुळे येत्या काळात मीशाचे आणखी काय फोटो बघावयास मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: New Photo: This is Shahid Kapoor's daughter's cute photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.