फराहनला श्रद्धाच्या आणि त्याच्या नात्याला द्यायचे आहे नवे नाव ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 17:55 IST2017-05-23T12:12:12+5:302017-05-23T17:55:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या नात्याबद्दल चर्चा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेंकाना टेड करत ...

फराहनला श्रद्धाच्या आणि त्याच्या नात्याला द्यायचे आहे नवे नाव ?
ग ल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या नात्याबद्दल चर्चा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेंकाना टेड करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धा आईवडिलांच्या घरातून सामानसकट बाहेर पडून थेट फरहानच्या घरात ठाण मांडून होती. शक्ती कपूरने जोरजबरदस्ती करून तिला परत घरी घेऊन गेले असल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर शक्ती कपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाचे खंडन केले होते. आता असे कळते की, फरहान आणि श्रद्धाला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे. श्रद्धाचे आणि फरहानचे नाते दोघांच्या ही घरातल्यांना मान्य नाही.
मीडियाच्या रिपोर्टनुसार श्रद्धा आणि फरहानला आपल्या नात्याला पुढील वळणावर घेऊन जायचे आहे आणि यासाठी हे दोघे ही तयार आहेत. रिपोर्टनुसार यामुळे दोघांचे ही कुटुंबीय नाराज झाले आहेत. फरहानची आई अभिनेत्री हनी इराणी यांना हे नाते पसंत नसल्याची चर्चा आहे. फरहानने गेल्या वर्षी त्याची पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहान यांना दोन मुली आहेत. फरहानने अधुनाला घटस्फोट देणे हे हनी यांना पटले नव्हते. कुटुंबीयांकडून कितीही विरोध होत असला तरी श्रद्धा आणि फरहान आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सध्या हे दोघे एकमेंकाच्या मित्रांसोबतची मैत्री वाढवताना दिसतायेत. श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींनी फरहानला आधीच पसंती दिली आहे. रॉक ऑन-2 च्या सेटवर फरहान आणि श्रद्धामधील नाते फुलले. या दोघांमधील जवळीक बघूनच अधुनाने फरहानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. फरहान आणि श्रद्धाच्या वयामध्ये बरेच अंतर आहे आणि ते श्रद्धाच्या घरच्यांना बिलकुल मान्य नसल्याची चर्चा आहे.
श्रद्धाचे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. आदित्य रॉय कपूरसोबतचा ओके जानू तर अर्जुन कपूरसोबतचा हॉफ गर्लफ्रेंडमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.