​पतीच्या आयुष्यात नवे प्रेम; म्हणून किम शर्मा परतली मुंबईत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 13:48 IST2017-04-10T08:18:16+5:302017-04-10T13:48:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर युवराजची एक्स गर्लफ्रेन्ड किम शर्मा हिच्या आयुष्यात काहीच ठीक नाहीयं. होय, किम तिचा बिझनेसमॅन पती ...

New love in husband's life; So Kim Sharma returns to Mumbai! | ​पतीच्या आयुष्यात नवे प्रेम; म्हणून किम शर्मा परतली मुंबईत!

​पतीच्या आयुष्यात नवे प्रेम; म्हणून किम शर्मा परतली मुंबईत!

लिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर युवराजची एक्स गर्लफ्रेन्ड किम शर्मा हिच्या आयुष्यात काहीच ठीक नाहीयं. होय, किम तिचा बिझनेसमॅन पती अली पुंजानीपासून वेगळी झाल्याची खबर आहे. विशेष म्हणते किमने नाही तर अलीने किमला सोडल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
होय, अलीच्या आयुष्यात एक नवी मुलगी आली आहे. या नव्या मुलीसाठी अलीने किमला सोडल्याचे कळते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किम मुंबईत राहते आहे. अलीने किमसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. म्हणजेच किमसोबतचे अलीचे हे दुसरे लग्न आहे. पण आता हे दुसरे लग्न मोडून अली तिसºया लग्नाच्या तयारीत आहे. किम अलीसोबत केन्यामध्ये राहायची. त्याच्याच कंपनीत सीईओ म्हणून ती कार्यरत होती. पण आता केन्यासोबतच हे सीईओपद  सोडून किम मुंबईत परतली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर किमला आता काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही कळतेय. 



केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली. मध्यंतरी किम पतीलासोडून दुसºया कुणाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिच्या आयुष्यात फॅशन डिझाईनर अर्जुन खन्नाने एन्ट्री घेतल्याचे बोलले गेले होते. डिझायनर अर्जुन खन्ना हा देखील विवाहित आहे. अलीकडे अनेकदा किम आणि अर्जुन यांना  एकत्र पाहण्यात आले. 
किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडण्यात आले आहे. क्रिकेटर युवराज सिंग नंतर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले.  

Web Title: New love in husband's life; So Kim Sharma returns to Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.