KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:57 PM2022-05-10T13:57:12+5:302022-05-10T13:57:50+5:30

KGF 2 चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी अद्याप या चित्रपटाची रसिकांवरील जादू कायम आहे. दरम्यान आता KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

New information regarding KGF 3 movie came to light, entry of dangerous villain in 'Baahubali'? | KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

googlenewsNext

साउथचा स्टार यश  (Yash) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) स्टारर चित्रपट KGF Chapter 2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने एकूण १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याच वेळी, KGF 2 हिंदीने ४०० चा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने दंगल सारख्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले असून हे आकडे अजूनही थांबलेले नाहीत. जर्सी, रनवे ३४ आणि हिरोपंती २ सारखे चित्रपट देखील या चित्रपटापुढे टिकले नाहीत. KGF 2 चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे आणि KGF 2 संपताच त्यांनी हुशारीने KGF 3 ची घोषणा केली. आता KGF 3 कडून प्रेक्षकांच्या अधिक अपेक्षा आहेत.

अशा परिस्थितीत आता खलनायक कोण असणार हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संजय दत्तने अधीरा होऊन बरीच प्रशंसा मिळवली. त्यामुळे यावेळीही खतरनाक व्हिलनची एन्ट्री होऊ शकते, असे मानले जात आहे. आता यासाठी एक नाव पुढे येत आहे आणि ते म्हणजे बाहुबली फेम राणा दग्गुबती. राणाने नुकतेच या चित्रपटाबद्दल प्रशांतचे कौतुक करणारे ट्विट केले. त्याबदल्यात त्यालाही उत्तर मिळाले आणि दोघांच्या एकत्र भेटीची चर्चा रंगली. राणा दग्गुबती आता प्रशांत भेटू शकतात तेही युक्रेनमध्ये.


राणा दग्गुबती आणि प्रशांत केजीएफ ३ चित्रपटाबाबत चर्चा करतील असे मानले जात आहे. प्रशांत प्रभासच्या सालार या चित्रपटाचेही दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातील कलाकारांची निवड आधीच झाली आहे. यानंतर तारक नावाच्या चित्रपटाचा क्रमांक येतो, पण तो मल्टिस्टारर चित्रपट नाही. त्यामुळे राणा दग्गुबती प्रशांतला फक्त KGF 3 साठी भेटणार असेल, असे मानले जात आहे. यश हा या चित्रपटात आधीच नायक आहे पण आता राणा दग्गुबती चित्रपटात खलनायकाची भूमिका करू शकतो. त्यामुळे आता राणा दग्गुबतीची KGF 3मध्ये एन्ट्री होणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: New information regarding KGF 3 movie came to light, entry of dangerous villain in 'Baahubali'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.