नील नितीन मुकेशने सुरू केली ‘साहो’ची शूटिंग; आता प्रभासच्या एंट्रीची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 16:37 IST2017-06-11T10:55:35+5:302017-06-11T16:37:37+5:30

​‘बाहुबली-२’च्या अफाट यशानंतर अभिनेता प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सूत्रानुसार या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट नील नितीन मुकेशचे नाव निश्चित असून, त्याने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

Neil Nitin Mukesh launches 'Shaho' shoot; Now waiting for Prabhas entry! | नील नितीन मुकेशने सुरू केली ‘साहो’ची शूटिंग; आता प्रभासच्या एंट्रीची प्रतीक्षा!

नील नितीन मुकेशने सुरू केली ‘साहो’ची शूटिंग; आता प्रभासच्या एंट्रीची प्रतीक्षा!

ाहुबली-२’च्या अफाट यशानंतर अभिनेता प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सूत्रानुसार या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट नील नितीन मुकेशचे नाव निश्चित असून, त्याने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. नीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगचा बिगुल वाजविण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. चित्रपटात नील दमदार भूमिकेत असून, त्याचा सामना ‘बाहुबली’ प्रभासबरोबर होणार आहे. 

दरम्यान, प्रभास सुट्या एन्जॉय करून नुकताच भारतात परतला असून, या चित्रपटासाठी त्याने नवा लुकही धारण केला आहे. गेल्या आठवड्यात त्याचा हेअर स्टायलिस्ट हाकिम अलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये प्रभास खूपच डॅशिंग दिसत होता. कदाचित हाच त्याचा चित्रपटातील लुक असावा, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चित्रपटात नील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याला प्रभासबरोबर जोरदार सामना करावा लागणार आहे. जर खलनायकच दमदार अ‍ॅक्शन करीत असेल तर नायक प्रभासच्या अ‍ॅक्शनचा अंदाज बांधणे मुश्कीलच म्हणावे लागेल. 
 

‘बाहुबली-२’च्या अफाट यशानंतर काही दिवसांपूर्वीच प्रभास अमेरिकेला सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. याकाळात त्याने अनेक स्क्रिप्ट्सवर विचार केला आहे. दरम्यान, ‘साहो’मध्ये त्याच्यासोबत बाहुबलीमधीलच देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी बघावयास मिळणार आहे. सुरुवातीला या भूमिकेसाठी कॅटरिनाचे नाव चर्चेत होते. परंतु आता अनुष्काचे नाव निश्चित झाले आहे. ‘बाहुबली-२’मध्ये अनुष्का आणि प्रभासची जोडी चांगलीच जमली होती, आता ‘साहो’मध्ये ही जोडी काय करिष्मा करणार याची उत्सुकता लागली आहे. 

प्रभासने काही दिवसांपूर्वीच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘बाहुबली’नंतर मी एका अ‍ॅक्शन चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटासाठी मी खूपच एक्साइटेड आहे.’ मात्र यावेळी प्रभासने त्याच्या भूमिकेविषयी फारशी माहिती देण्यास नकार दिला होता. प्रभासच्या ‘साहो’चा टिझर ‘बाहुबली-२’च्या रिलीजबरोबरच आउट करण्यात आला होता. टिझरमध्ये प्रभासचा अ‍ॅक्शन लुक बघावयास मिळत होता. 

Web Title: Neil Nitin Mukesh launches 'Shaho' shoot; Now waiting for Prabhas entry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.