नील नितिन मुकेशने पूर्ण केले 'इंदु सरकार'चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 12:19 IST2017-06-01T06:48:06+5:302017-06-01T12:19:27+5:30

अभिनेता नील नितिन मुकेशने नुकतेच इंदु सरकार या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुकेशने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरचा फोटो अपलोड ...

Neil Nitin Mukesh completes shooting of 'Indu Sarkar' | नील नितिन मुकेशने पूर्ण केले 'इंदु सरकार'चे शूटिंग

नील नितिन मुकेशने पूर्ण केले 'इंदु सरकार'चे शूटिंग

िनेता नील नितिन मुकेशने नुकतेच इंदु सरकार या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुकेशने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरचा फोटो अपलोड केला आहे. नील नितिन मुकेश या चित्रपटात संजय गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 1975 ते 1977 च्या 21 महिन्यांच्या कालावधीत इंदिरा गांधींने आणीबाजी जाहीर केली होती यावर आधारित हा चित्रपट आहे. कीर्ति कुल्हारी, तोता रॉय चौधरी आणि अनुपम खेर यांच्या ही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे संगीत बप्पी लहरी आणि अनु मलिक यांनी एकत्र मिळून दिले आहे. 

नीलने फोटो शेअर करताना लिहितो, चढता सूरज धीरे-धीरे या गाण्याला दिलेल्या नव्या चालीचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. संजय गांधी यांच्या लूकमधला फोटो त्यांने शेअर केला आहे. यात फोटोत त्याच्यासोबत मधुर भंडारकरपण आहे. या फोटोला नीलने कॅप्शन दिलंय, आणि 'इंदु सरकारचे' शूटिंग पूर्ण झाले. मधुर भंडारकरसोबत चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस खूप मस्त होता. येत्या 28 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये इंदु सरकारच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. . 


या चित्रपटानंतर नील साहो चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अ‍ॅक्शन करताना दिसणार असल्याचे कळते आहे  ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये नील नितीन मुकेशची निगेटीव्ह भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. फिल्म मेकर्सलाही नीलची ही ‘बॅड बॉय इमेज’ आवडली आहे. त्यामुळेच बॉलिवूडसोबत साऊथच्या अनेक ऑफर्स त्याला येत आहे.  

Web Title: Neil Nitin Mukesh completes shooting of 'Indu Sarkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.