‘मुबारकाँ’मध्ये नेहा शर्माची लागणार वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 17:32 IST2016-11-16T17:32:21+5:302016-11-16T17:32:21+5:30

‘तुम बिन २’मध्ये दोन अभिनेत्यांना आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणारी गुणी अभिनेत्री नेहा शर्मा आता लवकरच एका कॉमेडी चित्रपटात दिसणार ...

Neha Sharma will be in 'Shubabat' | ‘मुबारकाँ’मध्ये नेहा शर्माची लागणार वर्णी?

‘मुबारकाँ’मध्ये नेहा शर्माची लागणार वर्णी?

ुम बिन २’मध्ये दोन अभिनेत्यांना आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणारी गुणी अभिनेत्री नेहा शर्मा आता लवकरच एका कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. होय, ‘मुबारकाँ’ हे या चित्रपटाचे नाव. नेहा ‘मुबारकाँ’मध्ये दिसणार, ही वार्ता कळल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद होणे साहजिक आहे. त्यामुळे सध्या तरी नेहा चाहत्यांकडून बेस्ट विशेस स्विकारण्यात बिझी झालीय. 

अनीस बाझमी दिग्दर्शित ‘मुबारकाँ’मध्ये अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार असून अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रुझ या दोघी मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात आणखी एकीची म्हणजेच नेहा शर्मा हिची भर पडणार आहे. अनिल कपूर पडद्यावर अर्जुनच्या काकाची भूमिका साकारणार  आहे. नेहाच्या भूमिकेचे महत्त्व शेअर करताना बाझमी म्हणाले,‘आम्हाला कथानकात तिसºया मुलीची गरज होती. जिची भूमिका छोटी पण तेवढीच महत्त्वपूर्ण असेल. नेहा अर्जुनच्या दुहेरी भूमिकांविषयी चित्रपटात माहिती करून देते.’ नेहा पुढील आठवड्यात दिल्लीत शूटिंगला सुरूवात करणार आहे. नव्या वर्षांत लंडनमध्ये चित्रपटाचे उर्वरीत शूटींग होईल. 

 नेहाचा ‘तुम बिन २’मधील अभिनय, तिचा गोड चेहरा, नजर खिळवून ठेवण्याची ताकद हे सर्व गुण तिने तिच्या अभिनयातून दाखवून दिले आहेत. या चित्रपटानंतर तिच्याकडे येणाºया आॅफर्स वाढल्या आहेत. आता ‘मुबारकाँ’मधील तिचा अभिनय प्रेक्षकांना कितपत भूरळ पाडतो, ते बघुयात! 

Web Title: Neha Sharma will be in 'Shubabat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.