नेहा म्हणते,‘मी डायहार्ड रोमँटिक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 14:23 IST2016-11-11T13:34:02+5:302016-11-11T14:23:26+5:30

आगामी ‘तुम बिन २’ चित्रपटात दोन हँण्डसम अभिनेत्यांसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीचा गोड चेहरा आठवतोय का? ‘तेरी फरियाद’ गाणं आपण ज्या गोड चेहऱ्यामुळे एन्जॉय ...

Neha says, 'I'm a dihard romantic' | नेहा म्हणते,‘मी डायहार्ड रोमँटिक’

नेहा म्हणते,‘मी डायहार्ड रोमँटिक’

ामी ‘तुम बिन २’ चित्रपटात दोन हँण्डसम अभिनेत्यांसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीचा गोड चेहरा आठवतोय का? ‘तेरी फरियाद’ गाणं आपण ज्या गोड चेहऱ्यामुळे एन्जॉय करू शकतो.. तो चेहरा कोण माहितीये का? होय, ती अभिनेत्री म्हणजे नेहा शर्मा. ‘यंगिस्तान’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आता ती ‘तुम बिन २’ मध्ये जवळपास २ वर्षांच्या ब्रेकनंतर दिसणार आहे. 

करिअरविषयी तर नेहा महत्त्वाकांक्षी आहे पण ती खऱ्या आयुष्यात कशी आहे? असे तिला विचारले असता ती म्हणते,‘मी डायहार्ड रोमँटिक आहे. पॅशन हे माझे दुसरे नाव आहे. मला सुंदर कथा वाचायला आवडतात. कवितालेखन  आणि परीकथा लिखान मला प्रचंड आवडतं. माझ्या आयुष्यात मी काय करायचे ते मीच ठरवणार. एखाद्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्याचा सर्वेसर्वा होऊ देणार नाही.’ गोड चेहरा पण थेट आणि स्पष्ट विचार असलेली नेहा शर्मा नव्या पिढीच्या कलाकारांचं प्रतिनिधीत्व करताना दिसतेय. 

तेलुगू इंडस्ट्रीत ‘चिरूथा’ चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करणाºया नेहा शर्माचा ‘तुम बिन २’ हा बॉलिवूडमधील दुसरा चित्रपट. तेलुगू इंडस्ट्रीच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये मिळणारा कमी प्रतिसाद पाहता करिअरविषयी चिंता तिला वाटली का? असे तिला विचारण्यात आले असता ती म्हणते,‘माझा पहिला चित्रपट ‘क्रुक : इट्स गुड टू बी बॅड’ २०१० मध्ये रिलीज झाला. तेव्हा मला चित्रपटाला कसा रिस्पॉन्स मिळतो याचं प्रचंड टेन्शन आलं होतं. पण व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी अपयश हे यायलाच हवं जेणेकरून त्याला यशाची किंमत कळते.’ 
 

Web Title: Neha says, 'I'm a dihard romantic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.