‘स्तनपान करतानाचा व्हिडीओ शेअर कर ना’ म्हणणाऱ्या युजरला नेहा धूपियाचे सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:09 PM2021-04-27T14:09:32+5:302021-04-27T14:12:34+5:30

अनेकदा आपल्या उत्तराने सोशल मीडियावर ट्रोलर्सची बोलती बंद करणारी Neha Dhupia सध्या अशाच एका कारणाने चर्चेत आहे. पुन्हा एकदा एका ट्रोलरला तिने असे काही सुनावले की, त्याची बोलती बंद झाली.

neha dhupia replied to troller who asked to post breastfeeding video | ‘स्तनपान करतानाचा व्हिडीओ शेअर कर ना’ म्हणणाऱ्या युजरला नेहा धूपियाचे सणसणीत उत्तर

‘स्तनपान करतानाचा व्हिडीओ शेअर कर ना’ म्हणणाऱ्या युजरला नेहा धूपियाचे सणसणीत उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअशा असंवेदनशील कमेंट्समुळे, विचारांमुळेच आपल्या देशातील महिला मुलांना स्तनपान करताना अन्कम्फर्टेबल असतात. आपल्याला ब्रेस्टफीडला सेक्शुअलाइज करायला नको, असे तिने म्हटले आहे.   

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया  (Neha Dhupia) परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा आपल्या उत्तराने सोशल मीडियावर ट्रोलर्सची बोलती बंद करणारी नेहा सध्या अशाच एका कारणाने चर्चेत आहे. पुन्हा एकदा एका ट्रोलरला तिने असे काही सुनावले की, त्याची बोलती बंद झाली.
आता हे काय प्रकरण ते जाणून घेऊ. तर आई बनल्यानंतर नेहाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती मुलीला स्तनपान करताना दिसली होती. तिच्या या फोटोवर एका युजरने अशी काही कमेंट केली की, नेहाला राहावले नाही. मग काय, तिने या ट्रोलरची चांगलीच शाळा घेतली.
‘तू तुझा ब्रेस्टफीड करतानाचा व्हिडिओ पोस्ट करू शकतेस का? नम्र विनंती!!!’, असे या युजरने लिहिले. ही कमेंट वाचून नेहा भडकली. तिने या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत, संबंधित युजरला फैलावर घेतले. (Neha Dhupia replied to troller who asked to post breastfeeding video)

‘मी नेहमी अशा अनेक कमेंटना टाळते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण हे जगासमोर आणणे आवश्यक होते. कारण यांच्यासारख्या व्यक्तींमुळे संपूर्ण स्त्रीजातीसाठी आपल्याच मुलांना अंगावरचे दूध पाजणे ही लाजिरवाणी गोष्ट बनते,’ असे नेहाने लिहिले.


इतकेच नाही तर कॅप्शनमध्येही तिने तिचे मत मांडले. ‘आई होणे काय आहे, हे फक्त तिलाच समजू शकते. मातृत्वासारखा दुसरा आनंद नाही. पण अनेकदा आपण सगळेच एक आनंदी असलेली बाजू पाहतो. पण दुसरीकडे ती थकलेली असते. तिच्यावर अचानक खूप जास्त जबाबदारी येऊन पडलेली असते. आपल्या मुलाला कुठे आणि कसे स्तनपान करावे, ही आईची मर्जी असायला हवी. पण अनेकदा स्तनपानाकडे सेक्शुअल पद्धतीने पाहिले जाते. अशा असंवेदनशील कमेंट्समुळे, विचारांमुळेच आपल्या देशातील महिला मुलांना स्तनपान करताना अन्कम्फर्टेबल असतात. आपल्याला ब्रेस्टफीडला सेक्शुअलाइज करायला नको, असे तिने म्हटले आहे.

  
 

Web Title: neha dhupia replied to troller who asked to post breastfeeding video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.