​अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिण्याची गरज - शर्मिला टागोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 19:35 IST2016-11-29T19:35:38+5:302016-11-29T19:35:38+5:30

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन तर दाक्षिणात्य सिनेमात रजनीकांत यांना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिल्या जातात व चित्रपटांची निर्मिती केली जाते. याचप्रकारे ...

The need to write the role by putting the actress at the center - Sharmila Tagore | ​अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिण्याची गरज - शर्मिला टागोर

​अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिण्याची गरज - शर्मिला टागोर

ong>बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन तर दाक्षिणात्य सिनेमात रजनीकांत यांना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिल्या जातात व चित्रपटांची निर्मिती केली जाते. याचप्रकारे अभिनेत्रींना देखी केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले. 

हिंदी चित्रपटातील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींमध्ये शर्मिला टागोर यांचा उल्लेख केला जातो. अनेक चित्रपटात त्यांनी उत्कृष्ठ भूमिका साकारल्या आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी भारतीय चित्रपटांवर आपले मत व्यक्त केले. आता महिलांना केंद्रस्थानी ठेऊन लेखकांनी भूमिका लिहाव्या असे त्यांनी सांगितले. 

शर्मिला टागोर म्हणाल्या. मला जर कुणी माझी इच्छा काय आहे असे विचारले, तर मी म्हणेल, या काळाची गरज अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपटाच्या भूमिका लिहायला हव्या. विशेषत: माधुरी दीक्षित, श्रीदेवी, वहिदाजी (वाहिदा रहेमान) आणि माझ्यासाठी या भूमिका असाव्या. कारण अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिल्या जातात. मग अभिनेत्रींसाठी भूमिका का लिहता येऊ नये. 

Roles need to be written for Actress - Sharmila Tagore :

शर्मिला यांनी आपली आत्मकथा लिहिणार असल्याचे सांगितले, मात्र त्यासाठी मी निश्चित कालावधी ठरविला नाही असेही त्यांनी सांगितले. शर्मिला टागोर म्हणाल्या, जेव्हा तुम्ही भूतकाळाबद्दल विचार करता त्यावेळी तुम्ही त्याचे अवलोकन करीत असता. मला असे वाटते की हे मी करायला हवे. चित्रपटातील दृष्यांमुळे महिलांवर अत्याचार वाढत असल्याचा त्यांनी इन्कार केला, त्या म्हणाल्या, पिंक सारख्या चित्रपटातून महिला अत्याचारावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर चित्रपटापेक्षा लोकांचे विचार बदलावे लागतील असेही त्यांनी सांगितले. 


Web Title: The need to write the role by putting the actress at the center - Sharmila Tagore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.