नवाजउद्दीनवर का आली डीएनए टेस्ट करण्याची वेळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 17:45 IST2017-04-24T10:20:35+5:302017-04-24T17:45:46+5:30

धर्माच्या नावावर राजकारण करण्याऱ्यांंना अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीने एक व्हिडिओच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे.

Nawazuddin's time to test DNA? | नवाजउद्दीनवर का आली डीएनए टेस्ट करण्याची वेळ ?

नवाजउद्दीनवर का आली डीएनए टेस्ट करण्याची वेळ ?

िनेता नवाजउद्दीन सिद्दीक सध्या मंटो चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी आहे. आपल्या खास अभिनयशैलीत नवाजने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आज सकाळी नवाजउद्दीनने एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यात प्लेकार्डच्या मदतीने त्यांने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

या व्हिडिओमध्ये त्यांने प्लेकार्डच्या माध्यमातून स्वत:चा परिचय दिला आहे. यात नवाजउद्दीन म्हणतो आहे त्यांने डीएनए टेस्ट केली आहे ज्यात 16.66 % हिंदू , 16.66 % ख्रिश्चन, 16.66 % मुस्लिम असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ मी 100 % फक्त कलाकार असल्याचे नवाजने म्हटले आहे. नवाजउद्दीनचा हा व्हिडिओ धर्माच्या नावाखाली राजकारण करण्याना एक चमराक आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नवाजउद्दीन म्हणाला या व्हिडिओ तयार करण्यामागे काही खास कारण नव्हते. हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला नाही आहे. जे नवाजचे वैयक्तिक विचार आहे जे त्यांने या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  3 हजारापेक्षा जास्त लोकांनी तो शेअर केला आहे आणि 92 हजार लोकांनी तो पाहिला आहे. 

नवाजउद्दनीचे 4 चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या रईस चित्रपटात शाहरुख खानपेक्षा नवाजउद्दीनचा अभिनय प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिला होता. त्याचे मुन्ना माइकल, मंटो, मॉम आणि बाबुमोशाय बंदूकबाज या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   

 

Web Title: Nawazuddin's time to test DNA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.