नवाजुद्दीन सिद्धीकीचे निहारिका सिंहसोबत होते शारिरीक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:48 IST2017-10-24T04:45:01+5:302017-10-24T14:48:53+5:30

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले नवाजुद्दीन सिद्धीकी यावेळेस त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर अफेअरला घेऊन ...

Nawazuddin Siddiqui's nephew was with the lion | नवाजुद्दीन सिद्धीकीचे निहारिका सिंहसोबत होते शारिरीक संबंध

नवाजुद्दीन सिद्धीकीचे निहारिका सिंहसोबत होते शारिरीक संबंध

ल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले नवाजुद्दीन सिद्धीकी यावेळेस त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर अफेअरला घेऊन चर्चेत आहे. 

नुकतेच  नवाजुद्दीन सिद्धीकीचे 'एन ऑर्डिनरी लाईफ' नावाचे जीवनचरित्र प्रकाशित झाले. यात नवाजने आपल्या खासगी आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले आहेत. नवाजुद्दीनच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक गोष्टी त्याच्या फॅन्ससमोर आल्या आहेत. पहिल्यादांच नावजने या पुस्तकात त्याच्या प्रेमप्रकरणाबाबत खुलासा केला आहे.  त्याच्या पुस्तकामध्ये चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे त्याचे आणि निहारिका सिंहचे अफेअर. २०१२ मध्ये 'मिस लवली'  चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्या दोघांमध्ये शारिरीक संबंध असल्याचा खुसालाही त्यांने केला आहे.  

नवाजुद्दीनने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की 'निहारिका ही एक समजूतदार मुलगी होती. ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे तिला माझे काम आणि माझी त्यामागच्या मेहनतीची जाणीव होती. ती मला दिवसभरात खूप वेळा फोन करायची आणि माझ्या कामाबद्दल विचारपूस करायची. ती माझ्याकडून फक्त प्रेमाचे दोन शब्दांची अपेक्षा ठेवयाची जे मी तिला कधीच देऊ शकलो नाही. मी स्वार्थी होतो माझे ध्येय निश्चित होते मला फक्त माझे तिच्या घरी जाऊन माझे काम झाल्याशी मतलब होते. पण हळूहळू तिला हे लक्षात आले आणि तिने माझ्याशी नाते तोडले".

ALSO READ‘गदर’च्या दिग्दर्शकाला मुलाला लॉन्च करण्यासाठी हवीयं नवाजुद्दीन सिद्दीकीची मदत! वाचा काय आहे मामला!!

निहारिका सिंहने २००५ मध्ये फेमिना मिसइंडिया चा 'किताब  पटकावला होता. त्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली आणि 'मिस लवली' चित्रपटातून डेब्यू केले. त्यानंतर ती अ न्यू लव्ह स्टोरी, सोहरा ब्रीज, अन्वर का अजब किस्सा अश्या काही चित्रपटातमध्ये तिने काम केले आहे.
विशालच्या भारद्वाजच्या आगामी चित्रपटात नवाज दिसणार आहे. यात त्याच्यासोबत आदिती राव हैदरी दिसणार आहे.  आदिती आणि नवाजुद्दीनची जोडी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडते. मात्र दोघांचे फॅन्स त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.  हा एक कॉमेडी चित्रपट असून लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. 

Web Title: Nawazuddin Siddiqui's nephew was with the lion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.