नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ पहिल्या प्रेयसीने म्हटले, ‘मला तुझी किळस वाटायची’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 13:56 IST2017-10-29T08:22:35+5:302017-10-29T13:56:32+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने त्याच्या ‘एन आॅर्डिनरी लाइफ’ या बायोग्राफीमध्ये अनेक महिलांशी नातेसंबंध असल्याचा खुलासा केला. त्यामुळे तो सातत्याने या ...
.jpg)
नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ पहिल्या प्रेयसीने म्हटले, ‘मला तुझी किळस वाटायची’!
अ िनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने त्याच्या ‘एन आॅर्डिनरी लाइफ’ या बायोग्राफीमध्ये अनेक महिलांशी नातेसंबंध असल्याचा खुलासा केला. त्यामुळे तो सातत्याने या विषयावरून वादाच्या भोवºयात सापडत आहे. पहिल्याच ‘मिस लवली’ या चित्रपटात नवाजुद्दीनची को-स्टार असलेल्या निहारिका सिंगने म्हटले होते की, नवाजने त्याचे पुस्तक विकले जावे म्हणून महिलांचा अनादर केला आहे. आता आणखी एका अभिनेत्रीने नवाजुद्दीनला खोटारडी व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. होय, थिएटर आर्टिस्ट आणि अभिनेत्री सुनील राजवार हिने फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहून नवाजवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तसेच त्याने महिलांचा आदर करायला हवा, असा सल्लाही दिला आहे.
नवाजने त्याच्या पुस्तकात सुनीताला त्याची पहिली गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले आहे. नवाजने लिहिले की, मुंबईत असताना माझे सुनीता नावाच्या अभिनेत्रीवर प्रेम जडले होते. परंतु एक दिवस ती त्याला सोडून गेली. आता सुनीताने यास उत्तर दिले असून, तिने फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुझा फोन रिसिव्ह करणे बंद केले होते. कारण तुझा विचार केल्यानंतर मला किळस वाटायची. त्यामुळे तुझ्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही. सुनीताने पुढे लिहिले की, ‘सहानुभूती मिळविण्याची नवाजला सवयच आहे. कधी स्वत:च्या रंगावरून, कधी गरिबीवरून तो सहानुभूती मिळवित आला आहे. खरं तर नवाज चांगल्या परिवारातून आहे.’
">नवाजने त्याच्या पुस्तकात सुनीताला त्याची पहिली गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले आहे. नवाजने लिहिले की, मुंबईत असताना माझे सुनीता नावाच्या अभिनेत्रीवर प्रेम जडले होते. परंतु एक दिवस ती त्याला सोडून गेली. आता सुनीताने यास उत्तर दिले असून, तिने फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुझा फोन रिसिव्ह करणे बंद केले होते. कारण तुझा विचार केल्यानंतर मला किळस वाटायची. त्यामुळे तुझ्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही. सुनीताने पुढे लिहिले की, ‘सहानुभूती मिळविण्याची नवाजला सवयच आहे. कधी स्वत:च्या रंगावरून, कधी गरिबीवरून तो सहानुभूती मिळवित आला आहे. खरं तर नवाज चांगल्या परिवारातून आहे.’
नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिले की, सुनीताने त्याला त्याच्या गरिबीमुळे सोडले. यास नकार देताना सुनीताने लिहिले की, ‘नवाजचे म्हणणे आहे की, तो गरीब आणि स्ट्रगलर असल्यामुळे मी त्याला सोडले. मग मला नवाजला विचारावेसे वाटते की, मी कोण होती. मी तर तुझ्यापेक्षा गरीब होती. तू तुझ्या घरात राहात होता, परंतु मी माझ्या मित्रांकडे आश्रय घेतला होता. ब्रेकअपचे खरे कारण सांगताना सुनीताने लिहिले की, ‘मी तुला या कारणामुळे सोडले होते की, तू आपल्यातील व्यक्तिगत संबंध आपल्या कॉमन फ्रेंडशी शेअर करून माझी खिल्ली उडवत होता. तेव्हा मला समजले की, तू एक स्त्री आणि प्रेम याविषयी काय विचार करतोस. त्यामुळे मी तुला तुझ्या गरिबीमुळे नव्हे तर तुझ्या गरीब विचारांमुळे सोडले. तू तुझ्या बायोग्राफीने हे सिद्ध केले की, मी ज्या नवाजला ओळखत होती, तो नवाज तेव्हापेक्षाही अधिक गरीब आहे. कारण तेव्हाही तुला महिलांचा आदर करता येत नव्हता आणि अजूनही तू तो शिकला नाहीस.
नवाज दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये सुनीताचा सिनियर होता. सुनीताने ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं, एक चालिस की लास्ट लोकल, संकट सिटी’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. या व्यतिरिक्त तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं, शगुन, रामायण, हिटलर दीदी, संतोषी माता’ आदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.