ओमपुरी यांना आॅस्करमध्ये श्रद्धांजली वाहिल्यावरून नवाजुद्दीन सिद्दीकीने केले धक्कादायक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 13:56 IST2017-02-28T07:23:27+5:302017-02-28T13:56:43+5:30

गेल्या रविवारी लॉस एंजेलिस येथे झालेल्या ‘आॅस्कर’ पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेता ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ...

Nawazuddin Siddiqui tweeted shocking tweets from Ompuri for paying tribute to Oscars | ओमपुरी यांना आॅस्करमध्ये श्रद्धांजली वाहिल्यावरून नवाजुद्दीन सिद्दीकीने केले धक्कादायक ट्विट

ओमपुरी यांना आॅस्करमध्ये श्रद्धांजली वाहिल्यावरून नवाजुद्दीन सिद्दीकीने केले धक्कादायक ट्विट

ल्या रविवारी लॉस एंजेलिस येथे झालेल्या ‘आॅस्कर’ पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेता ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांना वाहिलेली श्रद्धांजली भारतीयांचा मान उंचविणारी ठरली. परंतु याता यावरून बॉलिवूडमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ओम पुरी यांच्या श्रद्धांजलीवरून असा काही मुद्दा उपस्थित केला की, ज्यामुळे बॉलिवूडकरांना विचार करायला भाग पाडले आहे. 



त्याचे झाले असे की, नवाजुद्दीनने नुकतेच एक ट्विट केले असून, त्यामध्ये ‘द अकादमी आॅस्करने दिवंगत अभिनेता ओमपुरी यांना श्रद्धांजली वाहून एकप्रकारे सन्मानित केले आहे. मात्र बॉलिवूडच्या एकाही अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांच्याविषयी एक शब्दही बोलले गेले नाही, हे खूपच लाजीरवाणे आहे’ नवाजुद्दीनच्या या ट्विटनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली असून, अनेकांकडून नवाजुद्दीनचे समर्थन केले जात आहे.  

@TheAcademy#Oscars paid homage 2 late #OmPuri, But in #bollywood award functions nobody converse single word for his contribution... SHAME— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) February 27, 2017}}}} ">http://

६ जानेवारी रोजी मुंबई येथे ओमपुुरी यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले होते. ओमपुरी यांचे बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान पाहताच त्यांना हा आॅस्करमध्ये श्रद्धांजली वाहिली गेली. परंतु बॉलिवूडकरांना ऐवढ्या मोठ्या महान अभिनेत्याचा कसा विसर पडू शकतो, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. नवाजुद्दीनच्या या ट्विटला अनेकांनी समर्थन देखील दिले आहे. तर काहींनी संतापही व्यक्त केला आहे. बॉलिवूडमध्ये जोपर्यंत तुमचे अस्तित्त्व आहे, तोवरच तुम्हाला मान, प्रतिष्ठा दिली जाते. त्यानंतर मात्र तुमचा लोकांना विसर पडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा स्वरूपाचेही काही रिट्विट केले गेले.  



आॅस्करमध्ये मेमोरियम सेगमेंटमध्ये ओमपुरी यांच्यासह जगभरातील अशा सेलेब्रिटीजना श्रद्धांजली वाहण्यात आली ज्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाइल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, एंटन येल्चिन, मॅरी टॅलर, मूर, किर्टन हॅनसन आणि जॉन हर्ट यांचा समावेश आहे. 

Web Title: Nawazuddin Siddiqui tweeted shocking tweets from Ompuri for paying tribute to Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.