नवाजुद्दीन सिद्दीकीला भावाकडून मिळाले 'हे' गिफ्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 09:37 IST2017-09-09T04:05:30+5:302017-09-09T09:37:45+5:30

नवजुद्दीन सिद्दीकी स्टारर बाबूमोशाय बंदूकबाज चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट गेला. प्रेक्षकांनासोबतच समीक्षकांनी ही या चित्रपटाचे कौतुक केले. रिपोर्टच्या ...

Nawazuddin Siddiqui Receives Gift from Brother! | नवाजुद्दीन सिद्दीकीला भावाकडून मिळाले 'हे' गिफ्ट !

नवाजुद्दीन सिद्दीकीला भावाकडून मिळाले 'हे' गिफ्ट !

जुद्दीन सिद्दीकी स्टारर बाबूमोशाय बंदूकबाज चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट गेला. प्रेक्षकांनासोबतच समीक्षकांनी ही या चित्रपटाचे कौतुक केले. रिपोर्टच्या अनुसार नवाजचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेल्याने त्याचा छोटा भाऊ शमास सिद्दीकीने त्याला काळ्या रंगाची लग्जरी कार त्याला गिफ्ट दिली आहे.    
या कारला बघून नवाज चांगलचा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला, ''मला नाही वाटले होते की शमास मला इतकी चांगलीच कार गिफ्ट म्हणून देईल. कादचित मला आतापर्यंत मिळालेल्या गिफ्टपैकी हे सगळ्यात महागडे गिफ्ट असेल. मी नेहमी कामावर लक्ष देण्यात विश्वास ठेवतो. मी आतापर्यंत काम करताना कोणत्याच्या गोष्टी अपेक्षा नाही ठेवली. मला मिळालेले हे गिफ्ट खूपच छान आहे आणि आयुष्यभर लक्ष राहिल माझ्या.'' 

बाबुमोशायला मिळालेल्या यशबाबत नवाज सांगतो, ''बाबूमोशाय हा कमी बजेट मध्ये तयार करण्यात आलेला वेगळ्या थाटणीचा चित्रपट आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की हा चित्रपट फक्त समीक्षकांना नाही तर प्रेक्षकांना ही आवडला आहे.'' 

आपल्या मोठ्या भावाला कार गिफ्ट करण्याचा विचार शमास खूप आधीपासून करत होता. नवाजला गिफ्ट देण्यासाठी या क्षणापेक्षा जास्त चांगला क्षण कोणाता असूच शकत नाही. हीच त्याला गिफ्ट देण्याची योग्यवेळ आहे.
 
ALSO READ :  नवाजुद्दीन सिद्दिकीने पतंगावर लव्ह मॅसेज लिहून केले होते प्रपोज; वाचा नवाजची लव्हस्टोरी!

नवाजकडे एक अष्टपैलू कलाकार म्हणून बघितले जाते. आतापर्यंत त्यांने साकारलेली प्रत्येक भूमिका ही वेगळी आहे. बाबूमोशाय बंदूकबाजमध्ये नावजाने बाबू या  कॉन्ट्रक्ट किलरची भूमिका साकारली आहे. यात त्यांनी आपला दमदार अभिनय सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यानंतर तो सुशांत सिंग राजपूत स्टारर 'चंदा मामा दूर के' मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.   

Web Title: Nawazuddin Siddiqui Receives Gift from Brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.