​नवाजुद्दीन सिद्दीकीने मागितली पूर्वप्रेयसींची माफी; बायोग्राफी घेतली मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 10:17 IST2017-10-31T04:45:49+5:302017-10-31T10:17:11+5:30

आपले ‘अ‍ॅन आॅर्डीनरी लाइफ’ हे जीवनचरित्र इतके गाजेल, याची कल्पना खुद्द नवाजुद्दीन सिद्दीकीलाही नसेल. नवाजुद्दीनचे आयुष्य जगजाहिर करणा-या या ...

Nawazuddin Siddiqui apologized for pre-trial; Biography taken back! | ​नवाजुद्दीन सिद्दीकीने मागितली पूर्वप्रेयसींची माफी; बायोग्राफी घेतली मागे!

​नवाजुद्दीन सिद्दीकीने मागितली पूर्वप्रेयसींची माफी; बायोग्राफी घेतली मागे!

ले ‘अ‍ॅन आॅर्डीनरी लाइफ’ हे जीवनचरित्र इतके गाजेल, याची कल्पना खुद्द नवाजुद्दीन सिद्दीकीलाही नसेल. नवाजुद्दीनचे आयुष्य जगजाहिर करणा-या या पुस्तकाचे काही दिवसांपूर्वीच प्रकाशन झाले. पण प्रकाशन होऊन उणेपुरे आठ दिवस होत नाहीत तोच, नवाजने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजने त्याच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर याबाबतची घोषणा केली आहे.





प्रकाशनापूर्वी ‘अ‍ॅन आॅर्डीनरी लाइफ’चे काही अंश प्रकाशित झाले होते. नवाजच्या आयुष्यातील ‘लव्ह, सेक्स अ‍ॅण्ड धोखा’ असे सगळे काही या पुस्तकातून जगापुढे आले होते. या पुस्तकात नवाजने पूर्वाश्रमीची प्रेयसी सुनीता राजवार शिवाय अभिनेत्री आणि सहकलाकार निहारिका सिंगसोबतच्या अफेअरबद्दल अनेक खुलासे केले लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरिरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती.  निहारिका सिंहबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे. मी कधीच तिच्याशी प्रियकरासारखे बोललो नाही. अखेर एके दिवशी तिला कळले की, मी केवळ स्वत:चा विचार करणारा पुरुष आहे आणि तिने मला सोडले.मी रडलो. गयावया केली. माफी मागितली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती,असे नवाजने यात म्हटले होते.

ALSO READ: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीतील ‘त्या’ धक्कादायक खुलाशावर अखेर बोलली निहारिका सिंह!!

नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफ पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते. एवढेच नाही तर नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. सहानुभूती मिळवायची नवाजला सवय आहे. कधी स्वत:च्या रंगावरून, कधी गरिबीवरून तो सहानुभूती मिळवत आलाय. त्याच्या या बायोग्राफीत काहीही सत्य नाही,असे तिने म्हटले होते.

ALSO READ: नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ पहिल्या प्रेयसीने म्हटले, ‘मला तुझी किळस वाटायची’!

याशिवाय एका वकिलाने नवाजवर निहारिका सिंग व सुनीता राजवार यांचा अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आपली बायोग्राफी अशी वादात सापडलेली पाहून नवाजने अखेर ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या चरित्रात्मक पुस्तकामुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्याने स्पष्ट केले.

Web Title: Nawazuddin Siddiqui apologized for pre-trial; Biography taken back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.