​पुन्हा पडद्यावर एकत्र येणार नवाब सैफ अली खान अन् बेगम करिना कपूर खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 12:09 IST2017-05-02T06:39:57+5:302017-05-02T12:09:57+5:30

करिना कपूरच्या प्रत्येक चाहत्याला कशाची प्रतीक्षा असेल तर ती म्हणजे, बेबोच्या कमबॅकची. प्रेग्नंसीनंतर करिनाला पाहण्यास सगळेच आतूर आहेत.करिनाच्या ‘वीरे ...

Nawab Saif Ali Khan and Begum Kareena Kapoor Khan will come together on screen again! | ​पुन्हा पडद्यावर एकत्र येणार नवाब सैफ अली खान अन् बेगम करिना कपूर खान!

​पुन्हा पडद्यावर एकत्र येणार नवाब सैफ अली खान अन् बेगम करिना कपूर खान!

िना कपूरच्या प्रत्येक चाहत्याला कशाची प्रतीक्षा असेल तर ती म्हणजे, बेबोच्या कमबॅकची. प्रेग्नंसीनंतर करिनाला पाहण्यास सगळेच आतूर आहेत.करिनाच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार असल्याचे कळतेय. याचदरम्यान करिनाच्या चाहत्यांची आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, करिना व तिचा लाडका हबी सैफ अली खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सैफ अली खानचा ‘शेफ’ हा सिनेमा येतोय. यात करिनाचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. होय, सैफसोबत ती या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. सूत्रांचे मानाल तर, करिनाचा हा कॅमिओ प्रेक्षकांसाठी सरप्राईज असेल. ‘शेफ’ची टीम त्यामुळेच याबद्दल फार काही बोलायला तयार नाही. चित्रपटाच्या रिलीजच्या तोंडावर याबद्दल खुलासा केला जाणार आहे. अलीकडे सैफ अली खान लंडनमध्ये ‘शेफ’च्या शूटींगमध्ये बिझी असताना करिनाने त्याला ज्वॉईन केले होते. त्याचे कारण हेच होते. तैमूरला एकट्याला घरी ठेवून करिना लंडनला गेली होती.
यापूर्वीही करिनाने सैफच्या ‘हॅपी एन्डिंग’मध्ये कॅमिओ केला होता. तेव्हाही ही गोष्ट लीक होऊ नये, यासाठी मेकर्सनी बराच खटाटोप केला होता. ‘शेफ’चे मेकर्सही असाच खटाटोप करताना दिसत आहेत.

ALSO READ : ​करण जोहरच्या पार्टीत दिसला करिना कपूरचा बोल्ड अवतार!

सैफचा हा चित्रपट राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित करत आहेत. येत्या १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा चित्रपट अमेरिकन चित्रपट ‘शेफ’चा आॅफिशिअल रिमेक आहे. यात सैफ अलीसोबत दाक्ष्णिात्य अभिनेत्री पद्माप्रिय दिसणार आहे. आता पद्माप्रियपेक्षा तुम्ही करिनाला पाहायला उत्सूक आहात, हे आम्हाला ठाऊक आहेच. पण त्यासाठी काही काळ प्रतीक्षा ही आलीच.

Web Title: Nawab Saif Ali Khan and Begum Kareena Kapoor Khan will come together on screen again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.