टी-शर्टवरील टॅग दर्शवितात स्टार्सचा स्वभाव; एक अभिनेत्री स्वत:ला समजते ‘सती सावित्री’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 16:14 IST2018-06-02T10:42:58+5:302018-06-02T16:14:28+5:30
बॉलिवूड स्टार्सनी कुठलाही पोशाख परिधान केला तरी तो तरुणांमध्ये ट्रेंड बनतो. हल्ली टी-शर्टचा ट्रेंड असून, स्टार्सनी परिधान केलेला टी-शर्ट ...

टी-शर्टवरील टॅग दर्शवितात स्टार्सचा स्वभाव; एक अभिनेत्री स्वत:ला समजते ‘सती सावित्री’!
ब लिवूड स्टार्सनी कुठलाही पोशाख परिधान केला तरी तो तरुणांमध्ये ट्रेंड बनतो. हल्ली टी-शर्टचा ट्रेंड असून, स्टार्सनी परिधान केलेला टी-शर्ट घेण्याचा तरुणाईचा आग्रह असतो. त्यातही त्यावर काही टॅग असल्यास त्यास विशेष पसंती दिली जाते. खरं तर स्टार्स त्यांच्या स्वभावाला अनुकूल असलेले टॅगचे टी-शर्ट परिधान करण्यास प्राधान्य देतात. आज आम्ही अशाच काही हटके टॅग लिहिलेल्या स्टार्सची टी-शर्टबद्दल तुम्हाला सांगणार आहोत...
![]()
कॅटरिना कैफ
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ ही दैनंदिन जीवनात टी-शर्ट आणि जीन्स या आउटफिटमध्येच अधिक वेळा बघावयास मिळते. त्यातही टॅग असलेला टी-शर्ट तिला अधिक आवडतो. तिच्या टी-शर्टवर लिहिलेल्या टॅगवर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल की, तो तिच्या बॉयफ्रेंडवर आधारित आहे.
![]()
रिचा चड्डा
‘फुकरे’ चित्रपटातील भोली पंजाबन अर्थात अभिनेत्री रिचा चड्डा हिला तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जाते. याचा अंदाज तिच्या टी-शर्टवरूनही लावता येतो. रिचा नेहमीच ‘जुगाडू-भोली’ या नावाचा टॅग असलेले टी-शर्ट परिधान करीत असते.
![]()
कंगना राणौत
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत स्वत:च्या हिमतीवर चित्रपट हिट करण्याचे धाडस ठेवते. सध्या ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर तिला तिच्या बिनधास्त स्वभावासाठीही ओळखले जाते. याचा अंदाज तिच्या टी-शर्टवरून येतो.
![]()
बिपाशा बसू
बॉलिवूडमध्ये बिपाशाचे करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. मात्र सुरुवातीच्या काळात तिने काही हिट चित्रपट दिल्यामुळे ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यातच तिच्या टी-शर्टवरून याचादेखील अंदाज घेता येतो की, तिला कुठल्याही हिट चित्रपटाची फारशी अपेक्षा नाही.
![]()
रणवीर सिंग
बॉलिवूडचा नेक्स्ट सुपरस्टार रणवीर सिंगने अल्पावधितच इंडस्ट्रित स्वत:चे स्थान बळकट केले आहे. केवळ अभिनयासाठीच नव्हे तर नवनव्या फॅशन ट्रेंडसाठीही त्याला ओळखले जाते. त्याचबरोबर त्याचा बिनधास्त स्वभावही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या टी-शर्टवर लिहिलेल्या टॅगवरून हे स्पष्टदेखील होते.
![]()
अर्जुन कपूर
अर्जुनविषयी सांगायचे झाल्यास त्याला बिनधास्त राहायला खूप आवडते. कारण चित्रपट हिट किंवा फ्लॉपच्या भानगडीत तो कधीच पडत नाही. तो केवळ एन्जॉय करून काम करणे पसंत करतो. त्याच्या टी-शर्टवर असलेला टॅग त्याच्या स्वभावाला अगदी फिट बसतो.
![]()
सोनाक्षी सिन्हा
‘दबंग’ गर्ल सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिच्या अफेअरच्या चर्चा फारच कमी वेळा कानावर आल्या आहेत. वास्तविक सोनाक्षी स्वत:ला ‘सती सावित्री’ समजते. हे आम्ही नाही तर तिच्या टी-शर्टवर असलेल्या टॅगवरून स्पष्ट होते. खरं तर सोनाक्षी चित्रपटातही किसिंग किंवा इंटीमेट सीन देण्यास स्पष्ट शब्दात नकार देते.