National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:14 PM2024-02-13T20:14:03+5:302024-02-13T20:15:31+5:30

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे.

National Film Awards: Names of Indira Gandhi-Nargis Dutt dropped from National Film Awards category, many changes made | National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारां(National Film Awards)मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे वगळण्यात आली आहेत. एका अधिसूचनेनुसार, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने सुचविलेल्या विविध श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये रोख पारितोषिकांमध्ये वाढ आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचा समावेश करण्यात आला. रिपोर्टनुसार, समितीने कोरोना महारोगराईदरम्यान झालेल्या बदलांवर चर्चा केली. हे बदल करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला.

२०२२ पुरस्कारांसाठीची एन्ट्री झाली बंद
चित्रपट निर्माते प्रियदर्शन हे देखील पॅनेलचे सदस्य आहेत. प्रियदर्शन म्हणाले की, त्यांनी डिसेंबरमध्ये अंतिम शिफारसी दिल्या होत्या. ते म्हणाले की, ध्वनीसारख्या तांत्रिक विभागात मी काही शिफारशी केल्या आहेत. २०२२ च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी प्रवेशिका ३० जानेवारी रोजी बंद करण्यात आल्या आहेत. महारोगराईमुळे पुरस्कार मिळण्यास एक वर्ष उशीर होत असून २०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार २०२३ मध्ये दिले जात आहेत.

पुरस्कारांची बदलली नावं
समितीने सुचविलेल्या आणि नियमांमध्ये समाविष्ट केलेल्या बदलांनुसार, 'दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार'चे नाव बदलून 'सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट' असे करण्यात आले आहे. बक्षिसाची रक्कम आधी निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात विभागली जायची, पण आता ती फक्त दिग्दर्शकाकडे जाईल. त्याचप्रमाणे 'नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'साठीचा 'नर्गिस दत्त पुरस्कार' आता 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' म्हणून ओळखला जाईल. ही श्रेणी सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार विभाग देखील एकत्र करण्यात आली आहे.

समितीत हे सदस्य झाले सामील
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांच्या अध्यक्षतेखाली युक्तिवाद समिती होत्या. त्यात चित्रपट निर्माते प्रियदर्शन, विपुल शाह, हाओबम पबन कुमार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) प्रमुख प्रसून जोशी, सिनेमॅटोग्राफर एस नल्लामुथू तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार आणि मंत्रालयाचे संचालक (वित्त) कमलेश कुमार सिन्हा यांचा समावेश होता.

रोख बक्षिसांमध्ये वाढ
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठीचे रोख पारितोषिक १० लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आले आहे, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील चांगल्या योगदानाबद्दल भारतीय चित्रपट व्यक्तिमत्वाला दरवर्षी दिले जाते. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम ३ लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी २ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार बक्षिसाची रक्कम वेगवेगळी होती. सुवर्ण कमळ पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, पदार्पण चित्रपट, संपूर्ण मनोरंजन देणारा चित्रपट, दिग्दर्शन आणि बालचित्रपटाला दिले जाते. तर, रौप्य कमळ राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये, सर्व अभिनय श्रेणी, सर्वोत्कृष्ट पटकथा, संगीत आणि इतर अशा श्रेणींतील विजेत्यांना दिले जाते.

Web Title: National Film Awards: Names of Indira Gandhi-Nargis Dutt dropped from National Film Awards category, many changes made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.