नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा, शेतकरी आंदोलनावरुन सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:29 PM2021-02-06T18:29:30+5:302021-02-06T18:35:34+5:30

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्धीन शाह यांनी समर्थन दिले आहे. त्यांची एक मुलाखत सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Naseeruddin Shah Reacts Over The Silence Of Bollywood Actors On Farmers Protest | नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा, शेतकरी आंदोलनावरुन सुनावले खडेबोल

नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा, शेतकरी आंदोलनावरुन सुनावले खडेबोल

googlenewsNext

सर्वच स्तरांतून शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेता यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता.इतकेच नाही तर आतंरराष्ट्रीय मिडीयाने देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे.अमेरिकेतील पॉप स्टार रिहानासह अनेक परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं, सध्या सर्वत्रच या आंदोलनाविषयी चर्चा सुरु असताना आमच्या चित्रपटसृष्टीतील मोठमोठे दिग्गज मात्र मौन बाळगून गप्प बसले आहेत असे सांगत नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांवर संतप्त टीका करत आंदोलनाचे समर्थन केले आहे. 

नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत जे कलाकार वेळोवेळी आपले मत मांडताना दिसतात आज तेच या आंदोलनावर काहीही बोलताना दिसत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित त्यांना वेगळीच भीती वाटत असावी ''जर काही मत व्यक्त केले, तर ते खूप काही गमावू शकतो. या लोकांनी  इतका पैसा कमावला आहे की, त्यांच्या पुढील सात पिढ्या बसून खातील तर तुम्ही किती गमवाल?,' अशा तीव्र शब्दांत  नसरुद्दीन शाह यांनी  मौन बाळगणा-या कलाकारांचा शाब्दिक समाचारच घेतला आहे.

 

व्हायरल झालेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन यांनी विविध मुद्देही मांडले आहेत. यावरुन आमपली मानसिकता काय आहे यावरही त्यांनी टीका केली आहे. शाहीन बागचे आंदोलनापासून ते लॉकडाऊन पर्यंत ज्या काही घटना घडल्या त्यावरही त्यांनी भाष्य करत आपले मतं मांडले आहे. नसीर म्हणतात जर कोणी म्हणालं हिंदी सिनेमा आवडत नाही, तरी त्याच्यावर आपण सरळ देशद्रोहीचा ठपका लावून मोकळे होतो. ना-ना प्रकारच्या धमक्या त्याला दिल्या जातात. मात्र आज ज्या मुद्दयावर बोलण्याची गरज आहे, त्यावर मात्र सगळेच मुग गिळून गप्प का आहेत ? शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. तर मला काही फरक पडत नाही असे बोलू शकता. परंतु मला खात्री आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढेल तीव्र होईल. आणि सामान्य जनताही यामध्ये सहभाग घेईल. शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे,' असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.

Web Title: Naseeruddin Shah Reacts Over The Silence Of Bollywood Actors On Farmers Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.