नर्गिस यांच्या एका अटीमुळे संपलं होतं राज कपूर यांच्यासोबतच नातं, मग सुनील दत्त यांच्याशी थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:02 PM2021-05-03T12:02:53+5:302021-05-03T12:08:16+5:30

राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली.

Nargis death anniversary here some lesser known facts | नर्गिस यांच्या एका अटीमुळे संपलं होतं राज कपूर यांच्यासोबतच नातं, मग सुनील दत्त यांच्याशी थाटला संसार

नर्गिस यांच्या एका अटीमुळे संपलं होतं राज कपूर यांच्यासोबतच नातं, मग सुनील दत्त यांच्याशी थाटला संसार

googlenewsNext


अभिनेत्री नर्गिस यांनी वयाच्या पाचव्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1935 मध्ये आलेला 'तलाश-ए-हक' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. यात  त्यांची एक छोटी भूमिका होती. जवळजवळ तीन दशके त्यांनी सिनेसृष्टी गाजवली  आणि कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांचे 3 मे 1981 रोजी बॉम्बे (आताचे मुंबई) येथे कॅन्सरमुळे निधन झाले.  आपण नर्गिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

नर्गिस यांचं कुटूंब 
नर्गिस यांचे खरे नाव कनीज फातिमा राशिद होते.  त्यांच्या वडिलांचे नाव मोहनचंद उत्तमचंद होते, जे पंजाबी मोहियल ब्राह्मण होते. नंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारले आणि आपले नाव अब्दुल रशीद ठेवले. नर्गिस यांची आई जाददान बाई, एक हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या.

राज कपूर यांच्यासोबत होत्या नात्यात
राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. राज कपूर नर्गिस यांना भेटण्याआधीच विवाहित होते. त्यामुळे त्यांनी नर्गिस यांच्याशी लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नर्गिस हे कळल्यावर त्या दु:खी झाल्या होत्या. नर्गिस यांनी राज कपूर यांना पहिल्या पत्नीस घटस्फोट देण्यास सांगितले मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर नर्गिस यांनी त्यांच्यासोबत असलेले नातं संपवलं. 

सुनील दत्त यांच्यासोबत थाटला संसार 
पहिल्यात नजरेत सुनील दत्त नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीच नर्गिस यांना सांगितली नाही.१९५७ साली साली सुनील दत्त व नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या सिनेमात एकत्र काम केले. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. याच सिनेमाच्या सेटवर सुनील दत्त यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्यातील लव्हस्टोरी बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.

Web Title: Nargis death anniversary here some lesser known facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.