​ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीतील ‘त्या’ धक्कादायक खुलाशावर अखेर बोलली निहारिका सिंह!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:27 IST2017-10-24T09:57:02+5:302017-10-24T15:27:02+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बायोग्राफी  अर्थात जीवनचरित्राचे येत्या २५ आॅक्टोबरला प्रकाशन होत आहे. लेखिका रितूपर्णा चॅटर्जी हिने  नवाजच्या आजपर्यंतच्या प्रवासावर ...

Najar Siddiqui's biography in 'Shabana' on the shocking revelation finally spoke Niharika! | ​ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीतील ‘त्या’ धक्कादायक खुलाशावर अखेर बोलली निहारिका सिंह!!

​ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीतील ‘त्या’ धक्कादायक खुलाशावर अखेर बोलली निहारिका सिंह!!

िनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बायोग्राफी  अर्थात जीवनचरित्राचे येत्या २५ आॅक्टोबरला प्रकाशन होत आहे. लेखिका रितूपर्णा चॅटर्जी हिने  नवाजच्या आजपर्यंतच्या प्रवासावर आधारित ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलेय. अर्थात‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ नामक हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले आहे.  कारण, नवाजच्या आयुष्यातील ‘लव्ह’,‘सेक्स’ अ‍ॅण्ड ‘धोखा’असे सगळे या पुस्तकाने जगासमोर आणलेय. या पुस्तकात नवाजने त्याचे प्रेमसंबंध आणि प्रेयसीच्या शरिराप्रति असलेले आकर्षण या गोष्टी अतिशय बेधडकपणे मान्य केल्या आहेत. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरिरात अधिक रस होता, अशी कबुली त्याने दिली आहे. अभिनेत्री निहारिका सिंह हिच्या सोबतच्या नात्यासंबंधी त्याने खळबळजनक खुलासा केला आहे. ‘निहारिका ही एक हुशार मुलगी आहे. ती माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी. तिला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे. मी कधीच तिच्याशी प्रियकरासारखे बोललो नाही. अखेर एके दिवशी तिला कळले की, मी केवळ स्वत:चा विचार करणारा पुरुष आहे आणि तिने मला सोडले.मी रडलो. गयावया केली. माफी मागितली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती, ’असे नवाजने यात म्हटले आहे.
 
ALSO READ: नवाजुद्दीन सिद्धीकीचे निहारिका सिंहसोबत होते शारिरीक संबंध

नवाजच्या या खळबळजनक खुलाशानंतर निहारिका हिनेही आपले तोंड उघडले आहे. ‘बॉलिवूडलाईफ’ला दिलेल्या मुलाखतीत निहारिकाने नवाजच्या बायोग्राफीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिस लव्हली या चित्रपटादरम्यान मी व नवाज अगदी थोड्या काळासाठी रिलेशनशिपमध्ये होतो. २००९ मध्ये अगदी काही महिने ही रिलेशनशिप टिकली. आज नवाजने मला फरचा कोट घातलेली आणि नवाजला बेडरूमपर्यंत घेऊन गेलेली महिला म्हणून सादर केलेय. यावर मी केवळ हसू शकते. नवाजला साहजिकच त्याचे पुस्तक विकायचे आहे आणि कदाचित यासाठी एका महिलेबद्दल अपमानास्पद लिहायलाही तो तयार आहे. मनाला वाट्टेल त्या कथा रचून आणि क्षणभंगूर संबंध रंगवताना नाहक सेन्सेशन निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत. त्याने जे काही लिहिलेय, त्याबद्दल मला काहीही ठाऊक नाही.नवाज एक गुणी अभिनेता आहे, हे मी आधीपासून म्हणत आलेय. पण त्याने हे अभिनयकौशल्य केवळ पडद्यापुरते मर्यादीत ठेवावे, असे मला वाटते. त्याच्या वाटचालीबद्दल मी अजूनही त्याला शुभेच्छा देईल. बस्स इतकेच मला म्हणायचेय,’ असे निहारिकाने म्हटले आहे.

Web Title: Najar Siddiqui's biography in 'Shabana' on the shocking revelation finally spoke Niharika!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.