‘नागिन’ मौनी रायच्या झोळीत ‘गोल्ड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 10:49 IST2017-06-22T05:19:44+5:302017-06-22T10:49:44+5:30

‘नागिन’ या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री मौनी राय सध्या शिकागोमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय. ‘नागिन’नंतर ‘नागिन2’मध्येही मौनीची ...

'Nagin' Goldy Rai's 'Gold'! | ‘नागिन’ मौनी रायच्या झोळीत ‘गोल्ड’!

‘नागिन’ मौनी रायच्या झोळीत ‘गोल्ड’!

ागिन’ या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री मौनी राय सध्या शिकागोमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय. ‘नागिन’नंतर ‘नागिन2’मध्येही मौनीची वर्णी लागली. पण लवकरच ‘नागिन2’ आॅफ एअर होणार आहे. अशात मौनीच्या चाहत्यांची निराशा होणे साहजिक आहे. आता नवी एखादी मालिका आल्याशिवाय  मौनी टीव्हीवर दिसणार नाही, हा विचार करून करून चाहते निराश झाले असतील. पण आता मौनीच्या या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक फक्कड बातमी आहे. होय, ही बातमी वाचून निराश चाहत्यांच्या चेह-यांवर हास्य फुलल्याशिवाय राहणार नाही. 

मौनीच्या हाती अक्षय कुमारचा एक मोठा चित्रपट लागलाय, ही ती खबर. सलमान खान मौनीला लॉन्च करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये होती. मग यानंतर सलमान नाही तर अक्षय कुमार मौनीला पहिला ब्रेक देणार, अशी बातमी आली. ही दुसरी बातमी खरी ठरली आहे. होय, अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटात मौनीची वर्णी लागली आहे. या चित्रपटात मौनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.अनुभव सिन्हाच्या ‘तुम बिन2’मधून कॅमिओ केल्यानंतर मौनी आता रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, यात मौनीची भूमिका एकदम हटके आहे. येत्या आॅगस्टमध्ये ती २० ते २५ दिवस या चित्रपटासाठी शूटींग करेल. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.

ALSO READ : म्हणून मौनी रायने दिला ‘इंटिमेट सीन’ला नकार!

‘गोल्ड’ हे एक स्पोर्ट बायोपिक आहे. भारतीय हॉकीपट बालवीर सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. बालवीरने १९४८, १९५२ आणि १९५६मध्ये सलग तीन सुवर्ण आॅलम्पिक पदके जिंकली होती.

Web Title: 'Nagin' Goldy Rai's 'Gold'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.