नागार्जुनची ‘ती’ सून जी एकेकाळी बनली होती त्याची ‘ऑनस्क्रीन आई,जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:40 IST2017-10-07T09:21:09+5:302017-10-07T16:40:26+5:30
दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकले. दोघांची पहिली भेट २००९ ...

नागार्जुनची ‘ती’ सून जी एकेकाळी बनली होती त्याची ‘ऑनस्क्रीन आई,जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा
द ्षिणेचा सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकले. दोघांची पहिली भेट २००९ मध्ये ‘ये माया चेसाव’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सामंथाचा हा पहिलाच चित्रपट होता. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याअगोदर सामंथा रूथ आणि नागा चैतन्य तब्बल सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. हा विवाहसोहळा शाही स्वरुपाचा होता.या दोन दिवसांच्या विवाह सोहळ्यावर तब्बल 10 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे बोललं जात होते. हिंदू आणि ख्रिश्चन या धर्मांनुसार दोघांचाही हा शाही विवाहसोहळा पार पडला.आता नागा आणि समांथा हनीमूनसाठी जाणार आहेत. हनीमूनवरुन परतल्यानंतर समांथा ही शिवकार्तिकेयनच्या सिनेमाचं शूटिंग सुरुवात करणार असल्याचं समजतंय. मात्र नागार्जुनची सून बनलेली समांथाने एका सिनेमात नागार्जुनच्या आईची भूमिका साकारली होती.तो सिनेमा होता.2014 साली आलेला 'मनम' या सिनेमात नागार्जुनच्या नवविवाहित सूनेनं म्हणजेच समांथा हिने नागार्जुनच्या आईची भूमिका साकारली होती.रिअल लाईफमध्ये वयाने दुप्पटीने मोठ्या असलेल्या नागार्जुन यांच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारायाला मिळणे मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यावेळी सांगितले होते.
नागा चैतन्य आणि समांथा विवाहबंधनात अडकणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना शेअर करते वेळी खुद्द नागार्जुनेच माझी ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी समांथा आता माझी लेक बनणार असल्याचे म्हटले होते.2014मध्ये आलेला 'मनम' सिनेमालाही चांगली पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे वयाच्या दुप्पटीने लहान असणारी समांथाने नागार्जुनच्या आईची भूमिका साकारल्यामुळे तिला अधिक पसंती मिळाली होती.आई आणि लेक अशी समांथा आणि नागार्जुन यांची केमिस्ट्रीही रसिकांना चांगलीच भावली होती.अभिनेता नागार्जुन यानं 'शिवा' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर मनीषा कोईरालासह त्याचा क्रिमिनल हा सिनेमाही नव्वदीच्या दशकात गाजला होता.मात्र नागार्जुनची खरी लोकप्रियता ही दक्षिणेच्या तेलुगू सिनेमात आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचे दोन लेकही सिनेमात काम करत आहेत. नागा चैतन्य आणि अखिल अशी त्याच्या मुलांची नावं आहेत.
पाहा : सामंथा आणि नागा चैतन्य लग्नाचे Inside Photo