एखाद्या परीसारखी दिसत होती नागार्जुनची सून सामंथा; मेहंदी सेरेमनीचे पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:09 IST2017-10-06T16:23:17+5:302017-10-07T14:09:04+5:30

साउथ इंडस्ट्रीमधील दोन मोठे स्टार सामंथा प्रभू आणि नागा चैतन्या विवाहाच्या बंधनात अडकले आहेत. गोव्यात अतिशय धूमधडाक्यात या दोघांच्या ...

Nagarjuna's daughter-in-law looked like a mess; See photo of Mehandi Ceremonies! | एखाद्या परीसारखी दिसत होती नागार्जुनची सून सामंथा; मेहंदी सेरेमनीचे पाहा फोटो !

एखाद्या परीसारखी दिसत होती नागार्जुनची सून सामंथा; मेहंदी सेरेमनीचे पाहा फोटो !

उथ इंडस्ट्रीमधील दोन मोठे स्टार सामंथा प्रभू आणि नागा चैतन्या विवाहाच्या बंधनात अडकले आहेत. गोव्यात अतिशय धूमधडाक्यात या दोघांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला आहे. दरम्यान, लग्नाअगोदर मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले असून, त्यामध्ये सामंथा एखाद्या परीसारखी दिसत आहे. सामंथाने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 



शिवाय सामंथाचे हे फोटो बघून एक गोष्टदेखील स्पष्ट होते, ती म्हणजे समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यासोबत लग्न केल्याने खूपच उत्साहित आहे. फोटोमध्ये सामंथाने एक पेस्टल रंगाचा लेंहंगा परिधान केला होता. यावेळी तिने मॅचिंग एक्सेसरीज कॅरी केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये समांथा खूप सुंदर दिसत असून, तिच्या चेहºयावरील स्माइल घायाळ करणारी आहे. 





सामंथा आणि नागा यांचा आज हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला. सामंथाने तिच्या आजीने दिलेली साडी यावेळी परिधान केली होती. या लग्नात बºयाचशा सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. या लग्नासाठी तब्बल १० कोटी रूपयांचा खर्च लागणार असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले होते. शिवाय १५० पाहुणेमंडळी या लग्न समारंभात सहभागी झाले होते. 





गोव्यात लग्न पार पडल्यानंतर हैदराबाद येथे लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. लग्नानंतर हे दोघेही तब्बल ४० दिवसांच्या हनिमूनसाठी जाणार आहेत. तत्पूर्वी दोघेही त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करणार आहेत. हनिमूनवरून परतल्यानंतर दोघे पुन्हा एकदा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होणार आहेत. 

Web Title: Nagarjuna's daughter-in-law looked like a mess; See photo of Mehandi Ceremonies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.