​ ‘सैराट’फेम नागराज मंजुळे घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अमिताभ बच्चनही सज्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:01 IST2017-08-07T05:31:23+5:302017-08-07T11:01:23+5:30

‘सैराट’फेम नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत आणि तेही महानायक ...

Nagaraj Manjule will take entry to Bollywood movie 'Sarat'! Amitabh Bachchan is also ready !! | ​ ‘सैराट’फेम नागराज मंजुळे घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अमिताभ बच्चनही सज्ज!!

​ ‘सैराट’फेम नागराज मंजुळे घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अमिताभ बच्चनही सज्ज!!

ैराट’फेम नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत आणि तेही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत.



खरे तर, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे प्रत्येकाचे स्वप्न आहे. बडे बडे दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात. दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सुद्धा याला अपवाद नाही. पण आता यासाठी फार प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण लवकरच नागराज मंजुळे व अमिताभ बच्चन एकत्र येत आहेत. होय,‘सैराट’फेम नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत आणि आपल्या पहिल्या बॉलिवूडपटासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे. या चित्रपटाबद्दल नागराज व अमिताभ यांच्यात गत दीड वर्षांपासून चर्चा सुरु आहे. गत जानेवारीत ही चर्चा फळास आली आणि नागराज यांनी अमिताभ यांना आपल्या चित्रपटासाठी साईन केले. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. नागराज यांचा हा चित्रपट एका सामाजिक मुद्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. अर्थात ही कथा काय, चित्रपटाचे नाव काय, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण त्याने फरक पडतोच कुठे? शेवटी नागराज व अमिताभ ही जोडी एकत्र येणार यातच, सगळे आले.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. या चित्रपटानंतर नागराज मंजुळे सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ‘सैराट’ने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूडच्या अनेक मोठ-मोठ्या मेकर्सला वेड लावले. त्यामुळेच की काय, करण जोहरसारखा मोठा मेकर्स ‘सैराट’चा हिंदी रिमेक घेऊन येतो आहे. आता नागराज यांच्या बॉलिवूडपटाकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. 

Web Title: Nagaraj Manjule will take entry to Bollywood movie 'Sarat'! Amitabh Bachchan is also ready !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.