सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसलेली ती ‘मिस्ट्री वूमन’ कोण? काळ्या बॅगने वाढवले रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 01:07 PM2020-08-16T13:07:51+5:302020-08-16T13:09:08+5:30

सुशांत प्रकरणी नवा दावा

mystery woman at sushant singh rajputs building on june 14 suspicions on black bag | सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसलेली ती ‘मिस्ट्री वूमन’ कोण? काळ्या बॅगने वाढवले रहस्य?

सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसलेली ती ‘मिस्ट्री वूमन’ कोण? काळ्या बॅगने वाढवले रहस्य?

googlenewsNext
ठळक मुद्देसंबंधित चॅनलने याबद्दल सुशांतच्या फॅमिलीचे वकील विकास सिंग यांच्यासोबतही चर्चा केली.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रोज नवे खुलासे होत आहेत. मुंबई पोलिस, पाटणा पोलिस, ईडीच्या तपासातून काही धक्कादायक बाबी समोर आल्यात. शिवाय सोशल मीडिया व वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातूनही अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता 14 जूनला सुशांतच्या बिल्डिंगमध्ये कथितरित्या एक मिस्ट्री वूमन दिसल्याचा दावा केला जात आहे.  14 जून याच तारखेला सुशांतच्या निधनाची बातमी आली होती.

रिपब्लिक टीव्हीने सुशांतप्रकरणी 4 टेप आणि दोन फोटो हाती लागल्याचा दावा केला आहे. रिपब्लिक टीव्हीने केलेल्या दाव्यानुसार, 4 टेप आणि 2 फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक व्यक्ति सुशांतच्या घराच्या आत आणि बाहेर एका काळ्या रंगाच्या बॅगसोबत दिसतोय. ही व्यक्ति सुशांतचा स्टाफ मेंबर दीपेश सावंत असल्याचा दावाही चॅनलने केला आहे. 14 जूनच्या या व्हिडीओत काळ्या रंगाच्या कपड्यांमधील एक व्यक्ती काळ्या रंगाची बॅग हातात पकडून उभा आहे. याचठिकाणी सुशांतने कथितरित्या फाशी घेतली होती. याठिकाणी मुंबई पोलिसही दिसत आहेत.
यानंतर काही वेळाने सुशांतचा मृतदेह एका स्ट्रेचरवर ठेवला जात असताना काळ्या बॅगेसोबत तीच व्यक्ति बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसतेय. यानंतर ती व्यक्ति परत येते. पण तिच्या हातात  ती काळी बॅग नसते. मग तो पोलिसांना सुशांतचा मृतदेह स्ट्रेचरवर नेण्यास मदत करतो.

मिस्ट्री वूमन कोण?
सुशांतच्या मृत्यूनंतर घटनास्थळी तपास सुरु असताना एक ब्ल्यू स्ट्रिपचा टॉप आणि बेज शॉर्टसमधील एक महिलाही व्हिडीओत दिसते. ती त्याच काळ्या रंगाच्या बॅग हातात घेऊन दिसलेल्या व्यक्तिसोबत बोलते आणि काही मिनिटांतच तिथून निघून जाते.  
संबंधित चॅनलने याबद्दल सुशांतच्या फॅमिलीचे वकील विकास सिंग यांच्यासोबतही चर्चा केली. त्यांनीही व्हिडीओ फुटेजमध्ये दिसलेल्या या दोन अज्ञात व्यक्तिबद्दल संशय व्यक्त केला. ही महिला आणि काळी बॅगसोबतची ती व्यक्ती कोण, याचा शोध घ्यायला हवा, असे वकील म्हणाले.
 

Web Title: mystery woman at sushant singh rajputs building on june 14 suspicions on black bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.