iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:37 PM2023-10-06T16:37:20+5:302023-10-06T16:41:50+5:30

मायराने नुकताच आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. या फोनची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे.

Myra Vaykul bought a new iPhone 15 Pro Max | iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स

Myra Vaykul

googlenewsNext

स्मार्टफोन विश्वातील Apple ब्रँडच्या iPhones चं वेड जगप्रसिद्ध आहे. नुकतेच Apple iPhone 15 भारतात लाँच झाला आहे. आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. आयफोन 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. पण भारतात सर्वात जास्त मागणी आयफोन 15 प्रो मॅक्सला दिसून येत आहे. हा या मालिकेतील सर्वात प्रीमियम फोन आहे. अनेक सेलिब्रिटींचीही आयफोनला पसंती आहे. चिमुकली मायराही आयफोनची फॅन आहे. 

 मायराने नुकताच आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. या फोनची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे. आपल्या नव्या फोनची झलक मायराने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि तिचे आई-बाबा पाहायला मिळत आहेत. मायरा आयफोनचे अनबॉक्सिंग करताना दिसत आहे.  नवा कोरा आयफोन घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरचं दिसून येतोयं.  

मायराची इतक्या कमी वयातही प्रचंड लोकप्रियता आहे. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकातून मायरा घराघरात पोहचली.  या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळने ‘परी’ची भूमिका साकारली होती. निरागस अभिनयाने मायराने सर्वांचे मन जिंकले होते.  सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. शिवाय, ती इन्स्टाग्रामवरही विविध व्हिडीओ पोस्ट करत असते.  मायराचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत. शिवाय, युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. 
 

Web Title: Myra Vaykul bought a new iPhone 15 Pro Max

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.