आमच्या पप्पांनी गणपती आणला! मायरा आणि साईराजची मस्ती आणि धम्माल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 19:45 IST2023-09-13T19:33:39+5:302023-09-13T19:45:21+5:30
चिमुकली स्टार मायरा वैकुळ आणि साईराजने एकत्र व्हिडीओ तयार केलाय. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर दोघांनी डान्स करत प्रेक्षकांना भुरळ घातली.

Myra Vaikul And Sairaj Kendre
आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. छोटी छोटी मुलं त्यावर रील्स बनवताना दिसतायत. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे, हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. आता चिमुकली स्टार मायरा वैकुळ आणि साईराजने एकत्र व्हिडीओ तयार केलाय. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'. या गाण्यावर दोघांनी डान्स करत प्रेक्षकांना भुरळ घातली.
मायराच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ व्हायरल झालाय. यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, 'किती गोड दिसत आहेत दोघेही'. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, 'खुपच छान'. चिमुकल्या दोस्तांचा हा क्युट व्हिडीओ चाहत्यांना पंसत पडला आहे.
चार वर्षांपूर्वी मनोजने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे लिहिले होते. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगले वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेत हे गाणं २०२२ मध्ये गाऊन घेतले होते.सुरुवातीला या गाण्याला सोशल मीडियावर दोन मिलियन व्ह्यूवज मिळाले होते. परंतु बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने या गाण्यावरील व्हिडिओ बनवल्यानंतर हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकजण या छोट्या मुलाचे चाहते झाले आहेत.