'फोटोग्राफ'च्या निमित्ताने माझे हे स्वप्न होणार पूर्ण - सान्या मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:45 PM2018-12-03T18:45:07+5:302018-12-03T18:47:24+5:30

'बधाई हो' चित्रपटानंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रा फोटोग्राफ चित्रपटात झळकणार आहे.

 My dream will be fulfilled on the occasion of 'Photograph' - Sanya Malhotra | 'फोटोग्राफ'च्या निमित्ताने माझे हे स्वप्न होणार पूर्ण - सान्या मल्होत्रा

'फोटोग्राफ'च्या निमित्ताने माझे हे स्वप्न होणार पूर्ण - सान्या मल्होत्रा

googlenewsNext
ठळक मुद्देसान्या मल्होत्रा व नवाजुद्दीन सिद्दीकी 'फोटोग्राफ'मध्ये दिसणार मुख्य भूमिकेतसान्या मल्होत्रा व नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच दिसणार एकत्र


दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा नुकतीच आयुषमान खुरानासोबत 'बधाई हो' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिने यात साकारलेली भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर आता ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'फोटोग्राफ' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच नवाजुद्दीनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
याबाबत सान्या मल्होत्रा म्हणाली की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.'
सान्याने फॅशन डिझायनर रितु कुमार याच्या स्टोर लॉन्चवेळी मीडियाशी बोलताना म्हणाली, 'मी आता फोटोग्राफचे शूटिंग सुरू केले आहे. ही बाब माझ्यासाठी खूपच खास आहे. रितेश बत्रा आणि नवाज सर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खुपच रोमांचकारी ठरला आहे.'


सान्या म्हणाली, चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मी थोडी नर्व्हस होते. पण, त्यानंतर मी त्यांचे सर्व इंटव्यू पाहिले. त्यात ते कशा प्रकारे आपली भूमिका साकारतात, याचे निरिक्षण केले. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करताना थोडा आत्मविश्‍वास मिळाला, असे तिने सांगितले. “फोटोग्राफ’चे काम पूर्ण होत आले असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे.
सान्या मल्होत्रा व नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मात्र त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

Web Title:  My dream will be fulfilled on the occasion of 'Photograph' - Sanya Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.