माझी स्पर्धा ही स्वतःशी आहे - अलिया भट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:47 IST2016-06-08T08:17:00+5:302016-06-08T13:47:00+5:30
अभिनेत्री अलिया भटच्या कारकिर्दीला केवळ चार वर्ष झाले आहेत. पण या चार वर्षांत तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ...
.jpg)
माझी स्पर्धा ही स्वतःशी आहे - अलिया भट
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री अलिया भटच्या कारकिर्दीला केवळ चार वर्ष झाले आहेत. पण या चार वर्षांत तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. हायवे या चित्रपटातील अलियाच्या अभिनयाचे कौतुक सगळ्यांनीच केले होते. अलिया आता उडता पंजाब या चित्रपटात एका ड्रग अॅडिटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल तिने सीएनएक्ससोबत मारलेल्या खास गप्पा...
---------------
* अलिया कधी तू एखाद्या चुलबुल्या मुलीची भूमिका साकारतेस, तर कधी बलात्कार पिडीत मुलीच्या भूमिकेत झळकतेस, आता उडता पंजाब या चित्रपटात तू एका ड्रग अॅडिटची भूमिका साकारत आहेस, नेहमीच वेगवेगळ्या भूमिका स्वीकारण्यामागेच कारण काय?
- माझ्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही माझी आता जबाबदारी आहे. माझ्या आधीच्या चित्रपटापेक्षा दुसऱ्या चित्रपटात मी चांगली भूमिका साकारायला पाहिजे असे मी स्वतः मनाशी ठरवलेले आहे. माझी स्पर्धा ही दुसरी कोणासोबतही नसून ती माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी नेहमीच माझ्या प्रत्येक भूमिकेकडे एक आव्हान म्हणून पाहाते. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यात एक मानसिक समाधान मिळते असे मला वाटते. कोणतीही भूमिका साकारताना ती भूमिका ग्लॅमरस आहे की नाही हा कधीच विचार करत नाही. भूमिका स्वीकारल्यानंतर त्या भूमिकेत मी सर्वस्व झोकून देते.
* उडता पंजाब या चित्रपटात ड्रग्ससारखा एक महत्त्वाचा विषय विषय हाताळण्यात आला आहे. त्याविषयी तू काय सांगशील?
- ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक तरुण ड्रग्सच्या अधीन जात आहे. यामुळे कुटुंबही उद्ध्वस्त होत आहेत. ड्रग्सची समस्या ही अनेक वर्षांपासून होती. पण सध्या ड्रग्स हे सहज उपलब्ध होत असल्याने ही समस्या वाढतच आहे. आजकाल १४ वर्षांचा मुलगाही ड्रग्स घेतो हे खरेच धक्कादायक आहे. ड्रग्स याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या चार कथा पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर काही टक्के लोकांनी जरी ड्रग्स घेणे सोडले तर आमचा तो विजय आहे असे आम्हाला वाटेल. तसेच हा चित्रपट पाहिल्यावर ड्रग्स अॅडिटच्या आजूबाजूला असलेल्या मंडळीं त्यांना चांगल्याप्रकारे हाताळू शकतील असे मला वाटते. ड्रग्स ही मोठी समस्या असूनही आजवर या विषयावर चित्रपट बनवण्यात आलेला नव्हता. पण उडता पंजाबने खूपच महत्त्वाचा विषय हाताळलेला आहे.
* उडता पंजाब या चित्रपटातील भूमिकेसाठी तुला काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
- या चित्रपटात मी एका बिहारी मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. बिहारी भाषा बोलणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण त्याहीपेक्षा या व्यक्तिरेखेची देहबोली कशाप्रकारे असणार यावर मला अधिक मेहनत घ्यायला लागली. कारण ही मुलगी अतिशय छोट्या गावातील आहे..गावातल्या मुलींची देहबोली ही शहरातील मुलींपेक्षा खूपच वेगळी असते. त्यांच्या चेहऱ्यावरही भावनाही खूप वेगळ्या असतात. त्यामुळे मला त्यावर अभ्यास करावा लागला. या चित्रपटातील माझ्या लुकवरही खूप मेहनत घेण्यात आली आहे. या लूकवर अनेक दिवस अभ्यास करण्यात आला. तसेच आमचे अनेक वर्कशॉपही झाले होते. हा लूक आम्ही ठरवला, त्यावेळी मला पाहून लोक घाबरणार नाहीत ना याची मला शंका होती. पण हा लूक खूप चांगला वाटत आहे असे टीममधील सगळ्यांचे म्हणणे होते. पहिल्या दिवशी तर मी या लूकमध्ये सेटवर आल्यानंतर मला कोणीच ओळखले नव्हते. माझ्याचसमोर शॉर्ट रेडी आहे अलियाला बोलवा असे सगळे एकमेकांना सांगत होते. यावरून माझा लूक खरेच खूप वेगळा असल्याची मला जाणीव झाली.
* सेन्सॉर बोर्डने उडता पंजाब या चित्रपटाच्या नावावर हरकत घेतली आहे, अशाप्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी होईल असे तुला वाटले होते का?
- चित्रपटाच्या नावावरून कॉन्ट्रोव्हर्सी होईल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचप्रकारे विचार स्वातंत्र्यही असणे आवश्यक आहे. आपल्या देशात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे महापुरुष होऊन गेले आहेत. त्यांनी आपल्याला नेहमीच आपली मते मांडावीत अशी शिकवण दिली आहे. त्यांची परंपरा आपण पुढे न्यावी असे मला वाटते. आपल्या देशात किएटिव्ह लिबर्टी असावी असे मला वाटते. पण त्याचसोबत सेन्सॉर बॉर्ड असणेही तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. पण सेन्सॉर बॉर्डनेदेखील प्रमाणपत्र देताना प्रौढ लोक काय पाहू शकतात याचा विचार करणे गरजेचे आहे. या चित्रपटावर मी अतिशय मेहनत घेतली असल्याने सेन्सॉर बोर्डाने काही निर्णय घेतल्यास मला नक्कीच दुःख होईन.
* आजच्या पिढीचे तू प्रतिनिधित्व करत आहेस, आजच्या पिढीबाबत तुला काय वाटते?
- आजची पिढी खूप प्रगत आहे. तांत्रिकदृष्ट्या आपण खूप प्रगती केली आहे. पण प्रगतीसोबत आजच्या पिढीने आपली जबाबदारी समजणे आवश्यक आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे याची जाण त्यांना होणे गरजेचे आहे. आजची पिढी ही खूप मॉर्डन आहे. पण म़ॉर्डन असतानाच त्यांनी आपली संस्कृतीही जपायला पाहिजे असे मला वाटते.
* शानदार हा तुझा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता त्याची कारणे तुला काय वाटतात?
- शानदार चित्रपटावर आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती. चांगला चित्रपट असेल तर तो नक्कीच चालतो. शानदार हा चित्रपट बहुतेककरून चांगला नव्हता. त्यामुळे तो चालला नाही. शानदार या चित्रपटाची संकल्पना खूपच चांगली होती. पण ती तितकी चांगली पडद्यावर उतरू शकली नाही यामुळे तो चित्रपट प्रेक्षकांना भावला नसेल असे मला वाटते.
* दिग्दर्शिका गौरी शिंदे यांच्या चित्रपटात तू शाहरुखकडूनसोबत काम करत आहेस, शाहरुखसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
- मी शाहरुख यांच्याकडून खूप काही शिकले आहे. माझ्या चार वर्षांच्या कारकिर्दीत जितक्या गोष्टी मी शिकले आहे. त्याच्या कित्येक पट गोष्टी मी शाहरुख यांच्याकडून केवळ काही दिवसांत शिकले. शाहरुख चित्रीकरणाच्या दरम्यान खूप साऱ्या गप्पा मारतात, त्यांच्या जुन्या चित्रपटांविषयी सांगतात, या सगळ्यातून खूप काही शिकायला मिळते. तुम्ही तुमच्या फॅन्सशी कशाप्रकारे वागावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे असे मला वाटते.