MUST READ : ​अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 10:10 IST2017-05-30T04:40:16+5:302017-05-30T10:10:16+5:30

आपल्या आयुष्याची चार वर्षे ‘बाहुबली’ प्रोजेक्टला दिल्यानंतर अभिनेता प्रभास हॉलीडेसाठी अमेरिकेला रवाना झाला होता. ‘बाहुबली’ प्रभासने जितकी मेहनत केली, ...

MUST READ: What did Prabhas at America's month-long vacation? | MUST READ : ​अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?

MUST READ : ​अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?

ल्या आयुष्याची चार वर्षे ‘बाहुबली’ प्रोजेक्टला दिल्यानंतर अभिनेता प्रभास हॉलीडेसाठी अमेरिकेला रवाना झाला होता. ‘बाहुबली’ प्रभासने जितकी मेहनत केली, ते बघता, या सुट्ट्यांवर त्याचा हक्कही होताच म्हणा. गत २८ एप्रिलला ‘बाहुबली2’ हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम तोडलेत. या अभूतपूर्व यशात मोठा वाटा असणारा प्रभास त्याचवेळी अमेरिकेत आपली सुट्टी एन्जॉय करत होता. प्रभासने या सुट्टीत काय काय केले, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असाल. तर तेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

प्रभास या सुट्टीवर आपल्या काही खास मित्रांसोबत गेला होता. अमेरिकेतील या महिन्याभराच्या सुट्टीतील एकही फोटो प्रभासने सोशल मीडियावर शेअर केला नाही. जेणेकरून त्याच्या हॉलीडेबद्दल कुणाला कळू नये. एकप्रकारे गेल्या महिनाभरात प्रभास भूमिगतच झाला होता. पण आमचे खरे मानाल तर प्रभासच्या अशा भूमिगत होण्यामागे एक वेगळेच कारण होते. होय,प्रभास अमेरिकेत काही नव्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत होता. तो त्याच्या पुढील चित्रपटांबद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊ इच्छित होता. त्याचमुळे त्याने या सुट्ट्या प्लान केल्या होत्या. अगदी शांततेत अनेक स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यातील काही स्क्रिप्ट प्रभासने फायनल केल्याचे कळतेय. तुमच्या आमच्यासारख्या बॉलिवूडप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, प्रभासने फायनल केलेल्या या चित्रपटांमध्ये एक हिंदी चित्रपटही आहे. हा हिंदी चित्रपट एक प्रेम कथा आहे. अर्थात अद्याप यापैकी कुठल्याही चित्रपटाला प्रभासने अधिकृत होकार कळवलेला नाही. सर्वप्रथम तो ‘साहो’ पूर्ण करणार. यानंतर पुढचा कुठला नवा सिनेमा हाती घ्यायचा, याचा निर्णय तो घेणार आहे. आहे ना प्रभास जीनिअस?
 
ALSO READ : 
प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे लग्न होता होता राहिले!

Web Title: MUST READ: What did Prabhas at America's month-long vacation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.