​मुंबईचा पाऊस अन् लारा दत्ता आणि महेश भूपतीचे ‘सोशल’ भांडण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 12:15 IST2017-08-30T06:45:09+5:302017-08-30T12:15:39+5:30

मुंबईच्या पावसाने सगळ्यांनाच झोडपून काढले. रस्त्यांवरचे पाणी लोकांच्या घरात जावून पोहोचलेय. केवळ सामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही. होय, अभिनेत्री लारा ...

Mumbai rain and Lara Dutta and Mahesh Bhupathi's 'social' fight !! | ​मुंबईचा पाऊस अन् लारा दत्ता आणि महेश भूपतीचे ‘सोशल’ भांडण!!

​मुंबईचा पाऊस अन् लारा दत्ता आणि महेश भूपतीचे ‘सोशल’ भांडण!!

ंबईच्या पावसाने सगळ्यांनाच झोडपून काढले. रस्त्यांवरचे पाणी लोकांच्या घरात जावून पोहोचलेय. केवळ सामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही. होय, अभिनेत्री लारा दत्ता हिचेच उदाहरण घ्या. काल मंगळवारी मुंबई जलमय झाली. सगळीकडे पाणीच पाणी. लाराच्या घरात पाणी शिरू लागले. मग काय, घरात पाणी येण्यापासून रोखण्यासाठी लाराने एक भारीच युक्ती शोधून काढली. लाडका हबी महेश भूपतीचे सगळे स्पोर्ट्स टॉवेल तिने घेतले अन् दरवाज्याच्या खालच्या फटीत कोंबले. दरवाज्याच्या फटीतून पाणी आत येऊ नये, यासाठी तिने हा सगळा खटाटोप केला. केवळ इतकेच नाही, तर याचा एक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘मी महेश भूपतीचे युएस ओपन, आॅस्ट्रेलिया ओपन आणि फ्रेंच ओपनच्या टॉवेल्सचा योग्य वापर केला. सर्व लोक सुरक्षित असोत,’असे कॅप्शन तिने या फोटोला दिले.





वाईफचा हा कारनामा पाहून व्हायचे तेच झाले. भूपती जाम भडकला. ‘तू गंमत करतेयं का? ही माझी अनेक वर्षांची मेहनत आहे,’असे त्याने रागारागात लिहिले. यावर लाराने प्रत्त्युत्तर देणे अपेक्षित होते. पण नवºयाचा पवित्रा बघून, लाराची जणू बोलतीच बंद झाली. आता यानंतरचा वाद दोघांनीही कसा हाताळला ते आम्हाला ठाऊक नाही. पण लारा व भूपतीच्या या सोशल भांडणाने लोकांचे मात्र जाम मनोरंजन झाले. मग काय लारा आणि भूपती दोघेही सोशल मीडियावर भांडत असलेले पाहून लोकांनी त्यांची चांगलीच खेचली. चाहत्यांनी दोघांनाही ट्रोल करणे सुरु केले. काहींना लाराचे हे काम मुळीच आवडले नाही. तर काहींचे यावरून चांगलेच मनोरंजन झाले. घरात फक्त बायकोचे राज्य चालते, याचा हा उत्कृष्ट नमुना, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. एका चाहत्याने ‘फ्रेंच टॉवेल्स सपोर्टींग फ्रेंच विन्डो्ज,’ असे लिहिले.



Web Title: Mumbai rain and Lara Dutta and Mahesh Bhupathi's 'social' fight !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.