बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांचेही झाले परदेशात शूटिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 18:42 IST2017-10-08T13:12:37+5:302017-10-08T18:42:37+5:30
अबोली कुलकर्णी यश चोप्रा यांना आपण ‘रोमान्सचा किंग’ म्हणतो. बॉलिवूडमधील अनेक गोष्टींची सुरूवात त्यांनीच केली. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ...
.jpg)
बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांचेही झाले परदेशात शूटिंग!
यश चोप्रा यांना आपण ‘रोमान्सचा किंग’ म्हणतो. बॉलिवूडमधील अनेक गोष्टींची सुरूवात त्यांनीच केली. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर जाऊन चित्रपटांचे शूटिंग करण्याची सवय देखील त्यांनीच बॉलिवूडला लावली. ‘सिलसिला’,‘हम तुम’ या चित्रपटांचे शूटिंग परदेशात करताना त्यांनी कुठलीच कसर सोडली नाही. प्रेग, स्वित्झर्लंड हे तर बॉलिवूडची आवडती ठिकाणं त्यांच्याच काळात लोकप्रिय झाली. परदेशात शूटिंग म्हटल्यावर आर्थिक तयारीही असलीच पाहिजे. यासर्व गोष्टी ध्यानात ठेऊन परदेशात शूटिंग सुरू झालं. बरं आता असंही काही नाही की, ठराविक काही चित्रपटांचेच परदेशात शूटिंग झाले होते. चला तर मग घेऊयात प्रातिनिधीक स्वरूपात ‘या’ चित्रपटांचा आढावा...
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे...
बॉलिवूडला राज-सिम्रनची जोडी मिळवून देणारा चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. हा चित्रपट यश चोप्रा यांचा मास्टरपीस म्हणून आपण ओळखतो. लंडन आणि स्वित्झर्लंड याठिकाणी चित्रपटाचे शूटिंग झाले. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी नयनरम्य पर्वणीच होती.
रॉकस्टार
रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांचा संगीतमय चित्रपट म्हणजे रॉकस्टार. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनीही खूप कौतुक केले. या चित्रपटाचेही शूटिंग प्रेग कॅसल, चार्ल्स ब्रीज याठिकाणी शूटिंग झालं. या चित्रपटानंतर रणबीर-नर्गिस यांच्या अभिनयाने रसिकांना अक्षरश: वेड लावलं.
जब तक हैं जान
शाहरूख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ यांचा ‘जब तक हैं जान’ हा चित्रपट यश चोप्रा यांचा एक मास्टरपीस आहे. या चित्रपटाचे शूटिंग इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. यातील ‘साँस’ या गाण्याचे शूटिंग इंग्लंडमधील मार्बल आर्क, सियॉन पार्क आणि मिलेनियम ब्रीज येथे झाले.
दोस्ताना
करण जोहरचे इंटरनॅशनल लोकेशन्सवर खूप प्रेम असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलंय. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग हे मियामी मधील क्रुस कॅपिटल येथे झाले आहे. मियामी हे अमेरिकेतील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. चित्रपटात मियामी बीच आणि साऊथ बीच ओशियन ड्राइव्ह येथे चित्रीकरण करण्यात आले आहे.
जिंदगी ना मिलेगी दोबारा
हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर यांचा अमेझिंग चित्रपट म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा. आयुष्याला पूर्णार्थाने जगण्याची मौज या चित्रपटात कलाकारांसोबतच प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळते. स्पेनमधील वेगवेगळया ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. परदेशातील विविध ठिकाणी फिरण्यासोबतच तेथील संस्कृती, राहणीमान यांचे देवाणघेवाण करणं या चित्रपटातून प्रकर्षाने जाणवले.