'चित्रपट भूमिका बघून निवडते' - ऋचा चढ्ढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 17:47 IST2017-07-05T06:58:46+5:302017-07-05T17:47:36+5:30

ओए लक्की लक्की ओए या चित्रपटातून ऋचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ...

'Movie Selections by Playing the Role' - Richa Chadha | 'चित्रपट भूमिका बघून निवडते' - ऋचा चढ्ढा

'चित्रपट भूमिका बघून निवडते' - ऋचा चढ्ढा

लक्की लक्की ओए या चित्रपटातून ऋचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपट, शॉर्ट फिल्म, रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये तिने काम केले आहे. भारतात पहिल्यांदाच लाँच होणाऱ्या व्हिडिओ ऑन डिमांटमध्ये या डिजिटल सीरीजमध्ये ती दिसणार आहे. याच संदर्भात तिच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.. 


याआधी तू शॉर्ट फिल्म, थिएटर आणि चित्रपटात काम केले आहेस तर तुझा डिजिटल मीडियावर काम करण्याचा अनुभव कसा होता ?
इथं काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि चांगला होता. या डिजिटल प्लॅाटफॉर्मवर काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. कारण इथे आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र होते. अॅक्शन, मसाला, आयटम साँग या सगळ्यांचा यात समावेश नसल्यामुळे त्याचे टेन्शन आम्हाला नव्हते. त्यामुळे सेन्सॉरची कात्री लागण्याची भीती आम्हाला नव्हती.  क्रिकेट या खेळ्याचे वेड आपल्या देशात खूप जास्त आहे तसेच बॉलिवूडबाबत ही लोकांमध्ये क्रेझ आहे. पण आपल्याला या दोन्हीमध्ये जाण्यासाठी किती स्ट्रगल आणि कष्ट करावे लागते याची कल्पना नसते. ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

यात तुझ्यासोबत विवेक ऑबेरॉयसुद्धा आहे त्याच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता ?
यात विवेक नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. हे तुम्हाला प्रोमो बघून लक्षात येईलच. विवेक मला सिनिअर आहे त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच छान होता. अनेक गोष्टी त्याच्यासोबत काम करताना मला  शिकायला मिळाल्या. तसेच अशा पद्धतीचे काम मी ही या आधी कधी केले नव्हते.  

तू थिएटर आणि चित्रपट दोन्ही ठिकाणी काम केले आहेस या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवला ?
थिएटर हे एक लाईव्ह माध्यम आहे ज्यात तुम्ही प्रेक्षकांशी डायरेक्ट कनेट होऊ शकता. चित्रपटात काम करताना तुम्हाला सुधारणा करण्याची संधी असते. एखादा सीन चांगला नाही झाला तर तुम्हाला तो परत करता येतो. थिएटरमध्ये काम करताना नाटक 1 तासाच असो किंवा 3 तासाच तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट पाठ करावी लागते. तसेच  थिएटरमध्ये काम करताना तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागते असे मला वाटते. 

तुझा कोणीही या क्षेत्रात गॉडफादर नाही आहे अशावेळी चित्रपट मिळाणे किंवा या इंडस्ट्रीत आपला निभाव लागणे किती कठीण असते ?
मला असे वाटते माझ्या वडिलांप्रमाणे प्रत्येक मुलीचे जर वडील असतील तर तिला आयुष्यात कधीही गॉडफादरची गरज  भासणार नाही. तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम असाल किंवा कोणत्या पद्धतीचे काम तुम्हाला करायचे आहे हे जर तुमचे चित्र क्लिअर असेल तर खूप गोष्टी सोप्या होतात. जर तुम्हाला माहिती आहे तुमचे कोणी इथे गॉडफादर नाही अशा वेळी तुम्हाला  पेशन्स ठेवावे लागतात.
 
तुझ्या आगामी प्रोजेक्टसबदल काय सांगशील ?
इन साइड एजनंतर मी एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या फुकरे रिटर्न मधून मी तुमच्या भेटीला येईन.

तू अभिनयाच्या क्षेत्राकडे कशी वळलीस ?
मी दिल्लीत असल्यापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मी मुंबईत शिक्षणाच्या निमित्ताने आले होते मात्र इथ येण्यामागचा माझा उद्देश अभिनयच होता. शिक्षण हे मुंबईत येण्य़ाचे निमित्त मात्र होते. मला अभिनयात करिअर करायचे होते. मी मुंबईत येऊन सोशल मीडियाचा डिप्लोपाचा कोर्स केला. हा कोर्सचा अभ्यास मी आनंदाने केला. या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला मी सल्ला देऊ इच्छते की या फिल्म इंडस्ट्री येण्यापूर्वी तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करा. कारण 
 
तू चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतेस  ?
चित्रपट मी भूमिका बघून निवडते. तसेच चित्रपटाची स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकदेखील चित्रपट निवडताना महत्त्वाचे घटक मी मानते. त्यामुळे कोणताही चित्रपट निवडताना मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते. तसेच माझ्यासाठी तुम्ही किती काम करता यापेक्षा तु्म्ही काय काम करता हे खूप महत्त्वाचे आहे.   

Web Title: 'Movie Selections by Playing the Role' - Richa Chadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.