​या चित्रपटाला आतापर्यंत सगळ्यात जास्त मिळाले आहेत पुरस्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 13:08 IST2017-07-10T07:38:03+5:302017-07-10T13:08:20+5:30

पुरस्कार हे कोणत्याही कलाकारासाठी खूपच खास असतात. त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना या पुरस्कारांमुळे मिळत असते. आपल्याला देखील एखादा ...

This movie has so far received the highest award ... | ​या चित्रपटाला आतापर्यंत सगळ्यात जास्त मिळाले आहेत पुरस्कार...

​या चित्रपटाला आतापर्यंत सगळ्यात जास्त मिळाले आहेत पुरस्कार...

रस्कार हे कोणत्याही कलाकारासाठी खूपच खास असतात. त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना या पुरस्कारांमुळे मिळत असते. आपल्याला देखील एखादा पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. एखाद्या चित्रपटाच्या टीममधील अनेकांना हा पुरस्कार एकाचवेळी मिळाल्यास त्यांना होणारा आनंद हा वेगळाच असतो. 
बॉलिवूडमध्ये एकाच वर्षांत सर्वात जास्त पुरस्कार मिळवणारा कोणता चित्रपट आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाचे नाव ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे हृतिक रोशनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याचे वडील राकेश रोशन यांनीच केले होते. या चित्रपटाला आतापर्यंतचे सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
कहो ना प्यार है या चित्रपटाची राकेश रोशन यांनी ज्यावेळी घोषणा केली, त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आणि अनेक पुरस्कारांवर बाजी मारली. या चित्रपटाने जवळजवळ 102 पुरस्कार वर्षभरात मिळवले. या पुरस्कारांची नोंद देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटाला इतके सारे पुरस्कार मिळण्याची ही एकमेव घटना आहे. 
कहो ना प्यार है या चित्रपटाने हृतिक रोशनसारखा सुपरस्टार बॉलिवूडला मिळवून दिला. हा चित्रपट, चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांचीच चर्चा त्यावेळी झाली होती. या चित्रपटातील गाणी तर प्रचंड गाजली होती. तसेच अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावली होती. 

Also Read : बॉलिवूडच्या चित्रपटात नायक-नायिकेने घातलेल्या कपड्यांचे काय होते तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: This movie has so far received the highest award ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.