बीचवर एकटीच मस्ती करताना दिसली मौनी रॉय, स्वत: शेअर केला व्हिडीओ
By गीतांजली | Updated: November 12, 2020 15:25 IST2020-11-12T15:20:58+5:302020-11-12T15:25:41+5:30
मौनी रॉय बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

बीचवर एकटीच मस्ती करताना दिसली मौनी रॉय, स्वत: शेअर केला व्हिडीओ
मौनी रॉय बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या जबरदस्त अभिनयाशिवाय बोल्ड फॅशन स्टाईलमुळेही ती लोकप्रिय आहे. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त चाहते त्याच्या सौंदर्यावर ही फिदा आहेत. इन्स्टाग्रामवर मौनीचे एक कोटी 50 लाख फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या प्लॉटफॉर्मवरुन ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
मौनीने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पांढर्या वाळूवर समुद्रकिनार्यावर मस्ती करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. यात त्याने पांढरा आणि काळ्या रंंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
छोटा पडदा ते थेट बॉलिवूड
एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत दिसली होती. यात तिने कृष्णा तुलसीची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड आवडली होती. यानंतर मौनीने 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.