​‘रॉक आॅन2’बद्दल आणखी काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 22:14 IST2016-09-05T16:44:50+5:302016-09-05T22:14:50+5:30

सन २००८ मध्ये फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन ’ आला होता. म्युझिकल ड्रामा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला ...

More about 'Rock An2' ... | ​‘रॉक आॅन2’बद्दल आणखी काही...

​‘रॉक आॅन2’बद्दल आणखी काही...

२००८ मध्ये फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन ’ आला होता. म्युझिकल ड्रामा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाच्या यशानंतर सुमारे ८ वर्षांनी ‘रॉक आॅन’चा सीक्वल घेऊ घातला आहे. फरहान अख्तर, अर्जून रामपाल आणि पूरब कोहली, श्रद्धा कपूर आणि प्राची देसाई यात दिसणार आहे. निश्चितपणे ‘रॉक आॅन2’बद्दल प्रेक्षकांना उत्सूकता आहे. फरहान अख्तर, अर्जून रामपाल आणि पूरब कोहली यांच्यासोबतच्या ‘फेसबुक चॅट’दरम्यान लोकांची हीच उत्सूकता दिसून आली. ‘रॉक आॅन2’ दाढीवाला लूक का? श्रद्धा दाढी वाढवणार का? तुम्ही हॅट का घातली? अशा अनेक मजेशीर प्रश्नांचा मारा लोकांनी केला. पण यापैकी काही प्रश्न आणि त्याची फरहान अख्तर, अर्जून रामपाल आणि पूरब कोहली यांनी दिलेली उत्तरे खास तुमच्यासाठी...



- तब्बल ८ वर्षांनंतर सीक्वल का?
आम्हाला ‘रॉक आॅन’ सीक्वल कधीचाच बनवायचा होता. पण आम्हाला चांगली स्टोरी, चांगली स्क्रिप्ट मिळत नव्हती. चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेण्यात आमची आठ वर्षे गेलीत. पण एका चांगली स्क्रिप्ट मिळेपर्यंत आम्ही थांबलो, याचे आज समाधान वाटते आहे. ‘रॉक आॅन2’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आमच्या प्रतीक्षेमागचे कारण नक्की कळेल.

‘रॉक आॅन2’मध्ये काय वेगळेपण असणार आहे?
-‘रॉक आॅन2’ची कथा पूर्णपणे वेगळी आहे. ‘रॉक आॅन’ जिथे संपला, तिथून ‘रॉक आॅन2’ची स्टोरी सुरु होतेयं. पण तरिही त्यात नाविण्य आहे. किंबहुना ‘रॉक आॅन2’ची कथा पूर्णपणे वेगळी आहे. यातील म्युझिक, लोकेशन्स हे सगळे प्रेक्षकांना आवडेल, असेच आहे. ‘रॉक आॅन1’पाहिलेल्या प्रत्येकाना ‘रॉक आॅन2’हा एक आश्चर्याचा धक्का असेल.

नवीन कॅरेक्टर कुठली असणार?
श्रद्धा कपूर आणि शशांक अरोरा हे नवे चेहरे या सिनेमाच्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहेत. श्रद्धा या सिनेमात आपल्या आयुष्याबद्दल संभ्रमात दाखवली आहे. गाणं तिची आवड आहे पण गाणं गायचं की नाही याबाबद मात्र ती निर्णयावर पोहोचली नाही असं काहीसं या सिनेमाचं कथानक आहे.





Web Title: More about 'Rock An2' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.