​कचराकुंडीत सापडली होती मिथुन चक्रवर्तीची मुलगी! आता दिसते अशी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 07:49 AM2017-08-27T07:49:33+5:302017-08-27T13:19:33+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सच्या डेब्यूचे वारे वाहू लागले आहे. श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ...

Mithun Chakraborty's daughter was found in trash! Now it looks !! | ​कचराकुंडीत सापडली होती मिथुन चक्रवर्तीची मुलगी! आता दिसते अशी!!

​कचराकुंडीत सापडली होती मिथुन चक्रवर्तीची मुलगी! आता दिसते अशी!!

googlenewsNext
्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सच्या डेब्यूचे वारे वाहू लागले आहे. श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यानंतर आणखी एक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. होय, मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी ही बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. खरे तर दिशानीच्या आयुष्याची कहानीही कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.


एका कचराकुंडीत  दिशानी सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता.त्या रस्त्यावरून अनेकजण गेलेत. पण जीवाच्या आकांताने रडणाºया त्या चिमुकलीला पाहून कुणाचेही हृदय द्रवले नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आणि मिथुनने नेमकी ही बातमी ऐकून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.


या चिमुकलीला दत्तक घेतल्यानंतर मिथुनने तिचे नाव दिशानी ठेवले. मिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले.यानंतर मिथुनने दिशानीला दत्तक घेतले आणि केवळ दिशानीचेच नाही तर मिथुनचेही आयुष्य बदलले. दिशानी प्रचंड स्टाईलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्या आहेत. दिशानीऐवजी मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत.




बॉलिवूडमध्ये येण्यास आतूर असलेली दिशानी बॉलिवूड चित्रपटांची मोठी चाहती आहे. सलमान खानचीही ती खूप मोठी चाहती आहे. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीत अ‍ॅक्टिंग शिकतेय. दिशानी सोशल मीडियावरही कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात फोटोंमध्ये ती न्यूयॉर्क फिल्म अकादमीच्या फ्रेन्ड्ससोबत दिसतेय.

Web Title: Mithun Chakraborty's daughter was found in trash! Now it looks !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.