Miss Universe 2017: ​भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणार का ही मॉडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 12:45 IST2017-11-09T07:15:33+5:302017-11-09T12:45:33+5:30

येत्या २६ नोव्हेंबरला अमेरिकेत ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्य स्पर्धेत कुठल्या देशाची सुंदरी बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान ...

Miss Universe 2017: Will India's Miss Universe win the title of this model? | Miss Universe 2017: ​भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणार का ही मॉडेल?

Miss Universe 2017: ​भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणार का ही मॉडेल?

त्या २६ नोव्हेंबरला अमेरिकेत ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्य स्पर्धेत कुठल्या देशाची सुंदरी बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान तमाम भारतीयांच्या नजरा श्रद्धा शशिधर हिच्यावर राहणार आहेत. श्रद्धा या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतेय. अलीकडे ‘मिस दिवा’चा किताब जिंकणा-या श्रद्धाकडून भारतीयांना प्रचंड अपेक्षा आहे.



श्रद्धा पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत, ‘मिस युनिव्हर्स’चा ताज आपल्या नावावर करेल, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. सन २००० मध्ये  लारा दत्ता हिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. तेव्हापासून या मुकूटाने भारतीयांना हुलकावणी दिली आहे. श्रद्धाने हा किताब जिंकल्यास भारतासाठी तो अतुच्च आनंदाचा क्षण असेल.



मे २०१७ हैदराबादमध्ये यामाहा फॅसिनो मिस दिवा २०१७ साठी झालेल्या आॅडिशनमध्ये यश मिळवल्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रद्धाने भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. श्रद्धाच्या घरची पार्श्वभूमीवर लष्करी आहे. त्यामुळे श्रद्धाने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा आणि पुढे सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा आई-वडिलांसाठी तिचा निर्णय काहीसा धक्कादायक होता. पण सरतेशेवटी त्यांनी आपल्या मुलीला पूर्ण पाठींबा दिला.



‘श्रद्धाने निवडलेली ही वाट समजायला आम्हाला काहीसा वेळ द्यावा लागला. तिचे हे यश राष्ट्राला समर्पित असेल’, अशी प्रतिक्रिया तिची आई शुभा शशिधर व वडील कर्नल शशिधर यांनी अलीकडे व्यक्त केली होती.



 श्रद्धाचा जन्म चेन्नईत झाला. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील लष्करी शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. यानंतर सोफिया कॉलेज फॉर वूमेनमधून तिने मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. श्रद्धाचे हिंदी, तामिळ, बंगला, पंजाबी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आहे. पेशाने अ‍ॅथलिट आणि मॉडेल असलेली श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. म्युझिक, स्पोर्ट आणि अ‍ॅडव्हेंचरची तिला विशेष आवड आहे. तूर्तास श्रद्धा मुंबईत राहते. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण श्रद्धाची आवडती अभिनेत्री आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर याच आवडत्या अभिनेत्रीच्या रांगेत बसण्याची संधी श्रद्धाला मिळू शकते. तूर्तास श्रद्धा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. तिचे सगळे लक्ष या किताबाकडे लागले आहे.‘मिस युनिव्हर्स’ किताबावर मी माझे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. मिळालेल्या संधीचे मी सोने करणार. याद्वारे सामाजिक भान जपत लष्करी क्षेत्रात विशेष कार्य करण्याची माझी इच्छा आहे, असे श्रद्धाने म्हटले आहे.
 

Web Title: Miss Universe 2017: Will India's Miss Universe win the title of this model?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.