क्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म, विश्वास नाही बसत तर पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:48 IST2021-07-09T14:44:29+5:302021-07-09T14:48:35+5:30
'मिमी' सिनेमाचा पहिला लूक शेअर केल्यानंतर तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

क्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म, विश्वास नाही बसत तर पाहा हा व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. बेबी बंम्पचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुड न्युज दिली होती. क्रिती सेनन रिअल नाही तर रिल लाईफसाठी इतकी मेहनत घेत आहे. होय, मिमी हा तिचा आगामी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाचे सध्या हटके अंदाजात प्रमोशन ती करत आहे. येत्या १३ जुलैला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचा पहिला लूक शेअर केल्यानंतर तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.या मोशन पोस्टरमध्ये क्रिती चक्क बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेयं. सिनेमात ती छोट्या गावात राहणाऱ्या मुलीची भूमिका क्रिती साकारणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकणार आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत ती गरोदर असल्याचे दिसते. पहिल्यांदाच क्रिती आईच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहतेदेखील तिच्या या नव्या अंदाजासाठी उत्सुक आहेत.
विशेष म्हणजे या सिनेमासाठी क्रितीने बरीच मेहनत घेतली आहे. क्रितीने भूमिकेसाठी आपले वजनही वाढवले होते. मिमीसाठी क्रितीने तब्बल 15 किलो वजन वाढवले होते. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्याही भूमिका आहेत. 'बरेली की बर्फी’, ‘लुकाछुपी’, ‘हाऊसफुल 4’ या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकल्यानंतर ती लवकरच ‘मिमी’ या सिनेमात झळकणार आहे. मिमी सिनेमाचे हटके प्रमोशन होत असल्यामुळे नक्कीच हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता असणार त्यामुळे आगामी सिनेमात क्रिती कितपत रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते हे पाहणेही रंजक असणार आहे.