मिलिंद सोमणने मोठे कान अन् लांब नाकाच्या कार्टूनसोबत फोटो शेअर करून ट्रोलर्सला दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 21:12 IST2017-11-16T15:42:22+5:302017-11-16T21:12:32+5:30

सध्याचे युग सोशल मीडियाचे असल्याने दर दिवसाला कुठला ना कुठला सेलिब्रिटी ट्विटर अथवा फेसबुकवर ट्रोल होत असतो. गेल्या काही ...

Milind Soman shared photo with big ears and a long nose cartoon handed to Troller! | मिलिंद सोमणने मोठे कान अन् लांब नाकाच्या कार्टूनसोबत फोटो शेअर करून ट्रोलर्सला दिले उत्तर!

मिलिंद सोमणने मोठे कान अन् लांब नाकाच्या कार्टूनसोबत फोटो शेअर करून ट्रोलर्सला दिले उत्तर!

्याचे युग सोशल मीडियाचे असल्याने दर दिवसाला कुठला ना कुठला सेलिब्रिटी ट्विटर अथवा फेसबुकवर ट्रोल होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये ईशा गुप्ता, दिशा पाटनी, विद्या बालन या स्टार्सला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर अभिनेत्री मिलिंद सोमण हादेखील गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्सच्या रडारवर आहे. खरं तर मिलिंद बºयाच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र त्याची गर्लफ्रेंड अंकिता हिच्यामुळे तो चर्चेत आहे. वयाने खूपच लहान असलेल्या अंकितासोबतचे काही फोटोज् त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मिलिंद नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. मिलिंद गेल्या वर्षभरापासून अंकिताला डेट करीत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने अंकितासोबत त्याचा ५२वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. त्याचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हेच फोटो आता त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. 

होय, ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंदला त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या मुलीसोबत अफेअर असल्यावरून नेटिझन्स विचित्र स्वरूपाच्या कमेण्ट त्याच्यावर करीत आहेत. मात्र मिलिंदवर नेटिझन्सच्या या कॉमेण्टचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. होय, मिलिंदने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तो ट्रोलर्सला एक मॅसेज देताना दिसत आहे. 
 }}}} ">Ankita&me with a #Troll with #VeryVeryBigEars and a #VeryVeryLongNose#Norwaypic.twitter.com/bH61ptgPYW— Milind Usha Soman (@milindrunning) November 14, 2017
गर्लफ्रेंड अंकितासोबत असलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिलिंदने लिहिले की, ‘अंकिता आणि मी, ट्रोल आमच्याकडे मोठे कान आणि एक लांब नाक आहे.’ हा फोटो एका कार्टूनसोबत काढण्यात आला आहे. या कार्टूनचे कान आणि नाक मोठे आहेत. दरम्यान, ५२ वर्षीय मिलिंद सोमणने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi हिच्याशी लग्न केले होते. मात्र हे लग्न यशस्वी ठरले नाही. तीन वर्षांतच दोघांचे नाते संपुष्ठात आले. आता तो अंकिताला डेट करीत आहे. अंकिताचे वय २० असून, पेशाने ती एअरहोस्टेस आहे. 

Web Title: Milind Soman shared photo with big ears and a long nose cartoon handed to Troller!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.