SEE PICS : मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरने केले barefoot wedding!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 18:57 IST2018-07-13T18:57:12+5:302018-07-13T18:57:52+5:30
अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचे प्रेम दिवसागणिक वाढताना दिसतेय. होय, ताजी बातमी तरी हेच सांगणारी आहे.

SEE PICS : मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरने केले barefoot wedding!
अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचे प्रेम दिवसागणिक वाढताना दिसतेय. होय, ताजी बातमी तरी हेच सांगणारी आहे. मिलिंद व अंकिताने निसर्गसौंदर्याने नटलेल्या स्पेनमध्ये दुस-यांदा लग्न केलेय. या barefoot weddingचे फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना “Till eternity with each other.The barefoot wedding we always wanted in the woods with the beautiful family.#barefootwedding #santiagodecompostela #bucketlist #theultrahusband #familytime,”असे तिने लिहिले आहे.
हे ड्रिम वेडिंग असल्याचे अंकिताने म्हटले आहे. पांढ-या रंगाचा गाऊन आणि फ्लोरल टियारा अशा वधू पोशाखात अंकिता कमालीची सुंदर दिसत होती.
याक्षणी मिलिंदची आई उषा सोमण आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते.
अलीकडे मिलिंद व अंकिता या दोघांच्या पहिल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोशूटमध्ये दोघांचाही क्लासी लूक दिसला होता.
मिलिंद आणि अंकिता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आपले प्रेम त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही. सोशल मीडियावर दोघांनी आपआपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अखेर हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले. याचवर्षी २२ एप्रिलला मिलिंद व अंकिताने पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला होता़
काही दिवसांपूर्वी मिलिंद व अंकिताचे ब्रेकअप झाल्याची खबर होती. पण मिलिंद व अंकिता दोघांनीही ब्रेकअपची ही बातमी खोटी ठरवत, लग्न केले. अंकिता दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. २०१३ मध्ये तिने एअर एशियात केबिन क्रू केबिन एग्झिक्यूटिव म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा येते. नोव्हेंबर २०१५ मध्ये अंकिताने मिलिंदसोबत तिचे पहिले मॅरेथॉन पूर्ण केले होते.