#MeToo : तो म्हणाला, तुला तांत्रिक विद्या शिकवतो, विवस्त्र होऊन माझ्यासमोर बस...! सोनल वेंगुर्लेकरने सांगितला धक्कादायक अनुभव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 09:04 PM2018-10-24T21:04:07+5:302018-10-24T21:05:12+5:30

‘साम, दाम, दंड, भेद’ फेम टीव्ही अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर तिने गंभीर आरोप केला आहे.

 #MeToo: He tried to forcibly remove my clothes: Sonal Vengurlekar accuses casting director of sexual harassmen | #MeToo : तो म्हणाला, तुला तांत्रिक विद्या शिकवतो, विवस्त्र होऊन माझ्यासमोर बस...! सोनल वेंगुर्लेकरने सांगितला धक्कादायक अनुभव!!

#MeToo : तो म्हणाला, तुला तांत्रिक विद्या शिकवतो, विवस्त्र होऊन माझ्यासमोर बस...! सोनल वेंगुर्लेकरने सांगितला धक्कादायक अनुभव!!

googlenewsNext

मीटू मोहिमेअंतर्गत आता ‘साम, दाम, दंड, भेद’ फेम टीव्ही अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर तिने गंभीर आरोप केला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनलने आपबीती सांगितली.   त्या काळात सोनल इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होती. याचदरम्यान तिची ओळख अभिनेत्री शीना बजाजचे वडील राजा बजाजसोबत झाली़ राजा बजाजने सोनलला आॅडिशनसाठी बोरिवलीत बोलवले. सोनलने सांगितले की, ‘मी बोरिवलीत गेले. राजा बजाजने आपल्या मुलीपासून सुरूवात केली. माझी मुलगी दिवसाला 55 हजार रूपये कमावते. मी तुलाही असे रोल मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी मला दिला आणि मला अस्टिस्टंचा जॉबही आॅफर केला. मी ती आॅफर स्वीकारली. यानंतर एका चित्रीकरणासाठी ते मला लोणावळ्याला घेऊन गेलेत. शूटदरम्यान त्यांनी मला काही कपडे दिलेत आणि घालून येण्यास सांगितले. मला काहीच कळेनासे झाले. मी कपडे बदलण्यासाठी माझ्या रूमकडे जात असताना राजा बजाजही माझ्या मागे आलेत आणि कुठलेसे क्रीम स्तनांना लाव, असे मला सांगू लागले. मी नकार देताच त्यांनी माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी तिथून पळाले. यानंतर ते बळजबरीने माझ्या खोलीत आलेत. मी तुला तांत्रिक विद्या शिकवतो. यामुळे तू स्टार बनशील, असे सांगून त्यांनी मला विवस्त्र होऊन त्यांच्यापुढे बसायला सांगितले. कपडे काढ अन् माझ्यासमोर बस आणि माझ्या मागोमाग मंत्रोच्चार कर, असे ते मला म्हणाले. मी घाबरले होते. पण तरिही सगळा धीर एकवटून मी नकार दिला आणि त्यांच्यावर किंचाळले. यानंतर त्यांनी जबरदस्ती करत माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. याही वेळी मी कशीबशी तिथून पळाले. या शूटवेळी   एक मॉडेल आणि तिची आई आमच्यासोबत होती. मी त्या दोघींनाही हा प्रकार सांगितला. यानंतर राजा बजाज आपले सामान तिथेच टाकून पळ काढल्याचे मला कळले,’असे सोनलने सांगितले.
ही घटना २०१२ ची असल्याचे तिने सांगितले. याप्रकरणीी सोनलने बजाजविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मॉडेल आणि तिच्या आईचा जबाबही नोंदवला होता. पण बजाज यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. सोनलने पैशाची मागणी केली़ ते न दिल्याने तिने आपल्यावर आरोप केल्याचे त्यांनी म्हटले होते.

Web Title:  #MeToo: He tried to forcibly remove my clothes: Sonal Vengurlekar accuses casting director of sexual harassmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.